State lead to sugarcane crush | Agrowon

ऊस गाळपात राज्याची आघाडी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जानेवारी 2018

पुणे : राज्यातील १८२ साखर कारखान्यांनी ऊस गाळपात जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ४५३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या हंगामात एकूण गाळप ४२० लाख टनाचे होते.

‘‘गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यातील साखर कारखान्यांकडून अतिशय समाधानकारक काम होत आहे. कारखान्यांनी गाळप वाढवल्यामुळे शेतकऱ्यांकडे एफआरपीच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जादा पेमेंट जाण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.

पुणे : राज्यातील १८२ साखर कारखान्यांनी ऊस गाळपात जोरदार आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ४५३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. गेल्या हंगामात एकूण गाळप ४२० लाख टनाचे होते.

‘‘गेल्या हंगामाच्या तुलनेत राज्यातील साखर कारखान्यांकडून अतिशय समाधानकारक काम होत आहे. कारखान्यांनी गाळप वाढवल्यामुळे शेतकऱ्यांकडे एफआरपीच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जादा पेमेंट जाण्याची शक्यता आहे,’’ अशी माहिती साखर उद्योग सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा किमान १९० साखर कारखाने गाळपाला उतरतील, असा राज्य शासनाचा अंदाज होता. प्रत्यक्षात आतापर्यंत १८२ कारखाने चालू झाले आहेत. त्यात ९८ सहकारी आणि ८४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

काही भागात ऊसदरासाठी उग्र आंदोलने होऊनदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखान्यांनी गाळपाचा वेग जोरदार ठेवला. त्यामुळेच  आतापर्यंत ४५३ लाख टन गाळप करून ४७.२० लाख टन साखर तयार केली आहे. राज्याचा साखर उतारा सध्या सरासरी १०.४३ टक्के येतो आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत  १४९ कारखान्यांनी अवघा २८१ लाख टन ऊस गाळून ३०.१० लाख टन साखर तयार केली होती.

राज्यात सर्वांत जास्त म्हणजे ६१ साखर कारखाने पुणे विभागात सुरू आहेत. या विभागाने १७७ लाख टन ऊस गाळून १८.५० लाख टन साखर तयार केली आहे. पुणे व कोल्हापूर विभागात यंदा भरपूर ऊस उपलब्ध असल्यामुळे गाळपाचा वेग पुढील दोन महिने टिकून राहील. त्यामुळे राज्याच्या एकूण साखर उत्पादनात यंदा भरीव वाढ दिसेल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

 

 

इतर बातम्या
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
भारतात गोड्या पाण्याची उपलब्धता घटलीवॉशिंग्टन ः भारतात उपलब्ध पाण्याचा आणि पाणी...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
उत्तर प्रदेशातील कारखान्यांची अतिरिक्त...नवी दिल्ली ः बाजारात साखरेचे पडलेले दर आणि...
वादळाने बाष्प खेचून नेले; अरबी समुद्रात...पुणे : अरबी समुद्रात मंगळवारी कमी तीव्रतेचे वादळ...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भ, मध्य...
अधिकाऱ्यांनी कोंडून दिली खुनाची धमकीपुणे  : कृषी खात्यातील पाणलोट व मृद्संधारण...
कापसाच्या ३७० वाणांच्या विक्रीला...नगर  ः बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि...
बफर स्टॉकच्या शक्‍यतेने साखर १००...कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून मंदीच्या...
दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्कोपुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
हिरापूरच्या बैल बाजारात चार कोटींवर...बीड : हिरापूर (ता. गेवराई) येथे बैलांचा आठवडे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍...जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...