sugar-prices-have-declined-200-rupees-six-months | Agrowon

साखरेच्या किमती सहा महिन्यांत २०० रुपयांनी घसरल्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत क्विंटलमागे २०० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे राज्य बॅंकेने हे मूल्यांकन गृहीत धरून कारखान्यांना देण्यात येणाऱ्या उचलीत ११० रुपयांनी घट केल्याने आता कारखान्यांना पहिल्या हप्त्यासाठी पुन्हा झगडावे लागण्याची चिन्हे आहेत. जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी धडपडणाऱ्या कारखान्यांना राज्य बॅंकेने मूल्यांकन कमी करून धक्का दिला आहे. राज्य बॅंकेने गुरुवारी (ता. २३) गेल्या तीन महिन्यांचा साखरेचे सरासरी दर गृहीत धरून कारखान्यांच्या उचलीत कपात केली आहे.

कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत क्विंटलमागे २०० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे राज्य बॅंकेने हे मूल्यांकन गृहीत धरून कारखान्यांना देण्यात येणाऱ्या उचलीत ११० रुपयांनी घट केल्याने आता कारखान्यांना पहिल्या हप्त्यासाठी पुन्हा झगडावे लागण्याची चिन्हे आहेत. जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी धडपडणाऱ्या कारखान्यांना राज्य बॅंकेने मूल्यांकन कमी करून धक्का दिला आहे. राज्य बॅंकेने गुरुवारी (ता. २३) गेल्या तीन महिन्यांचा साखरेचे सरासरी दर गृहीत धरून कारखान्यांच्या उचलीत कपात केली आहे.

मे २०१७ पर्यंत देशांतर्गत साखरेचे दर ३६०० रुपयांवर गेले होते. त्यानंतर मात्र साखरेच्या दरात दहा ते वीस रुपयांनी घट होत गेली. आता हे ३३९० ते ३४०० रुपयांपर्यंत खाली आहे आहेत. दोन महिन्यांपूर्वी राज्य बॅंकेने ३५०० रुपये दर गृहीत धरून त्या हिशेबानुसार पोत्यावर ८५ टक्के कर्ज कारखान्यांना दिले होते. या दरानुसार साधारणपणे २९७५ रुपये कारखान्यांना मिळत होते. आता २८८० रुपयापर्यंतची रक्कम कारखान्यांच्या हाती येणार आहे. यातूनही बॅंक वजावट व कारखान्याचा व्यवस्थापन खर्च असा ७५० रुपयांचा खर्च वजा जाणार आहे. सध्या कारखान्यांतून जी साखर तयार होत आहे, त्यासाठी ही कपात झालेली उचल मिळणार असल्याने कारखान्यांना आता शंभर रुपयांसाठी धावाधाव करावी लागणार आहे. 

साखरेच्या घसरत्या किमती व राज्य बॅंकेच्या मूल्यांकनाबाबत अनेक साखर कारखाना प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी संघटनांच्या आंदोलनातून सावरत असतानाच आता राज्य बॅंकेनेही अर्थसाह्याबाबत हात आखडता घेतला आहे. बहुतांशी साखर कारखान्यांनी या अगोदरच एफ.आर. पी पेक्षा २०० रुपये जादा दर देण्याची घोषणा केली आहे. २०० रुपयांचा जादा दर देवून उत्पादकांना आपल्याकडे खेचण्यासाठी कारखान्यांची स्पर्धा लागली होती. काही कारखान्यांनी अद्यापही इतरांपेक्षा जास्त दर देण्यासाठी दर जाहीर केलेला नाही, अशा कारखान्यांना आता राज्य बॅंकेच्या साखरेवरील मूल्यांकन घटीने धक्का लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. कारखान्याचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. मूल्यांकन घटविले तरीही आम्हाला शेतकऱ्यांचे पैसे द्यावेच लागणार आहेत. यामुळे कुठूनतरी तुटीची रक्कम आम्हाला उपलब्ध करावीच लागणार असल्याची हताश प्रतिक्रिया एका कारखानदाराने व्यक्त केली.

सध्या जागतिक बाजारात साखरेचा दर २६०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. तर देशांतर्गत बाजारपेठेत या महिन्यात ३४०० रुपयांपर्यंत दर होते. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने निर्यातीवर कर लावले आहेत. तसेच स्टॉक लिमिटसारखी धोरणे अवलंबल्याने साखरेच्या दरात घसरण होत असल्याची माहिती या उद्योगातील सूत्रांनी दिली. अशा धोरणांमुळे कारखानदारी अडचणीत येत असतानाच राज्य बॅंकेने 
दरात कपात केल्याने तोंड दाबून बुक्‍क्यांचा मार अशी अवस्था कारखानदारांची होत असल्याचे कारखानदारांनी सांगितले.

इतर अॅग्रोमनी
कांद्यातील नरमाई किती काळ?कां द्याच्या बाजारात जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८...
शेतकरी कंपन्यांनी राबवला थेट विक्रीचा...राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना...
सर्व पिकांच्या फ्युचर्स भावात वाढीचा कलएनसीडीइएक्समध्ये या सप्ताहात गवार बी, गहू व हरभरा...
सरकारने साखर आयात केली नाही कोल्हापूर : सरकारने पाकिस्तानातून कोणतीही साखर...
दीडशे लाख क्विंटल कापूस शिल्लकजळगाव : देशात आजघडीला सुमारे १५० लाख क्विंटल...
गवार बी वगळता सर्व पिकांच्या फ्युचर्स...एनसीडीइएक्स मध्ये या सप्ताहात हळद, गहू व हरभरा...
पंजाबात गव्हाची १२१ लाख टनांपेक्षा अधिक...चंडीगड : पंजाब राज्यात सरकारी संस्था आणि...
कशी रोखणार पुरवठावाढ?शेतीमाल पुरवठावाढ ( Supply glut) ही मोठी ...
साखरेचा बफर स्टॉक न केल्यास अडचणी...पुणे : देशातील साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे...
एमार कंपनी महाराष्ट्रात अन्न...मुंबई : अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सौदी अरेबियाची...
मक्याच्या भावात घसरणया सप्ताहात सर्वात अधिक घसरण गवार बी मध्ये (८.६...
तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळलाजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या...
डॉलर वधारल्याने कापसात निर्यात संधीजळगाव : रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरचे दर ६६ रुपये...
चीनमध्ये सोयापेंड निर्यातीला संधीनवी दिल्ली : अलीकडच्या काळात जागतिक दोन आर्थिक...
सरासरी मॉन्सूनमुळे २८.३ दशलक्ष टन...नवी दिल्ली : चांगल्या मॉन्सूनच्या हजेरीच्या...
मका वगळता सर्व पिकांच्या भावात वाढया सप्ताहात हळद, गहू व गवार बी यांच्यातील किरकोळ...
भारतीय कापसाची सर्वाधिक आयात...जळगाव : भारतीय कापसाचा (गाठी) मोठा खरेदीदार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
आंबा निर्यातीला सुरवातपुणे  ः महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या वाशी...
पंजाबात गव्हाची ३५ लाख टन खरेदीचंडिगड : पंजाब राज्यात बुधवार (ता.१८) पर्यंत ३४....