क्षारपड जमीन सुधारणेसाठी निचरा पद्धतीचा वापर

क्षारपड जमीन सुधारणे
क्षारपड जमीन सुधारणे
क्षारपड जमिनीतील क्षारांचा आणि पाण्याचा जोपर्यंत निचरा होणार नाही, तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून त्या लागवडीखाली आणता येत नाहीत. त्यामुळे योग्य निचरा पद्धतींचा वापर करावा.  
जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करताना प्रवाहाची दिशा, निचरा शेताबाहेर सोडण्यासाठी नैंसर्गिक जलस्त्रोतांची उपलब्धता आदी बाबींचा विचार करावा लागतो. त्यानुसार निचरा पद्धतीचा अवलंब करावा.   
उघडे चर निचरा पद्धत 
  • जमिनीमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा साधारणतः उंच भागाकडून सखल भागाकडे असते. त्यामुळे उताराला आडवे चर काढावेत. 
  • उघड्या चरांचा शेवट ओढा, मोठा नाला वा नदीला जोडावा. त्यासाठी सर्व आडवे चर उभ्या चराला जोडून घ्यावेत व चराला ०.१० टक्के उतार द्यावा. 
  • चरांना कार्यक्षमपणे चालू ठेवण्यासाठी त्यात साचलेला गाळ, वाढलेले तण, पाणकणीस वेळोवेळी काढून चर स्वच्छ ठेवावेत. या पद्धतीसाठी हेक्‍टरी १० ते १५ हजार रुपये खर्च येतो.
  • उघड्या चरीमध्ये दगड -गोटे, मुरूम किंवा चाळवाळू वापरून १ ते १.५ फूट जाडीचा थर द्यावा. त्यानंतर या चरी मातीने बुजवून घेतल्यास ही पद्धत भूमिगत निचरा पद्धतीप्रमाणे कार्य करते.  
  • भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत 
  • भूपृष्ठापासून ०.९ ते १.८ मीटर खोलीचे चर काढावेत. त्यात सच्छिद्र पीव्हीसी निचरा पाइप उताराला आडवे टाकून त्यांच्याभोवती गाळण (फिल्टर) म्हणून ७.५ ते १० सें.मी. जाडीचा चाळ वाळूचा थर द्यावा. सिंथेटिक फिल्टर पाइपभोवती गुंडाळले तरीही चालते. फिल्टर जोडलेले पाइप जमिनीत उतार देऊन गाडावेत.
  • या पद्धतीत लॅटरल (उपनळ्या) पाइप, कलेक्‍टर (उपमुख्य नळी) पाइप आणि मेन पाइप (मुख्य नळी) एकमेकांना अशा पद्धतीने जोडल्या जातात, की जेणेकरून पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार व अतिरिक्त पाणी मातीतून पाझरून प्रथम लॅटरल पाइपमध्ये येतात आणि लॅटरल पाइपमधून वाहत येणारे पाणी आणि क्षार कलेक्‍टर पाइपमध्ये येते. कलेक्‍टर पाइपमधून मुख्य पाइपवाटे शेवटी नैसर्गिक ओढा, नाला किंवा नदीमध्ये सोडावे. 
  • ज्या ठिकाणी नैसर्गिक प्रवाह नसेल त्या ठिकाणी निचरा होणारे पाणी विहीर किंवा तलावामध्ये साठवून उपसा करून शेताबाहेर काढावे. 
  • या पद्धतीसाठी हेक्‍टरी ७५,००० ते ८०,००० रुपये खर्च येतो. या पद्धतीचे आयुष्य कमीत कमी २० ते २५ वर्षे असल्यामुळे उघड्या चरीच्या तुलनेने खालील फायदे मिळतात.
  • फायदे  
  • भूमिगत निचरा पद्धत पूर्णतः जमिनीखाली ०.९ ते १.८ मीटर खोलीवर असते. त्यामुळे जमीन वाया जात नाही. मातीची धूप होत नाही.
  • उघड्या चरीप्रमाणे कडा ढासळणे, पाणकणीस वाढणे, वारंवार देखभाल व दुरुस्तीचा खर्च येत नाही.
  • उघड्या चरीप्रमाणे यांत्रिक मशागत, आंतरमशागत, अवजारे वाहतूक इत्यादी कामांना अडथळे येत नाही.
  • उघड्या चरीपेक्षा २० ते २५ वर्षे अधिक कार्यक्षमपणे चालू राहते. 
  •  
    भूमिगत निचरा पद्धतीसाठी आवश्‍यक बाबी   
    सच्छिद्र बांगडी पीव्हीसी निचरा पाइप ः हे पाइप ८०, १००, १६०, २००, २९४, ३५५ आणि ४५५ मि.मी. व्यासाचे असतात. आवश्‍यकतेप्रमाणे पाइपची निवड करावी. पाइपवर ८ ते १५ मि.मी. लांब व ०.८ ते २.० मि.मी. रुंदीची चौकोनी छिद्रे असतात. चौकोनी छिद्रांची संख्या एक मीटर पाइप लांबीमागे १०० ते १२० असते.
    गाळणी ः पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पाइपमध्ये जाऊ नयेत म्हणून पाइपच्या वर ७.५ ते १० सें.मी. जाडीचा चाळ वाळूचा थर द्यावा. त्यानंतर मातीने चर बुजवून घ्यावेत. अलीकडे सिंथेटिक फिल्टरचा वापर केला जात आहे. कारण यामुळे वाहतुकीचा, मजुरीचा खर्च कमी येतो. तसेच चारीमध्ये पाइप अंथरताना त्रास होत नाही.तसेच पाइपची छिद्रे बंद होण्याचा धोका टळतो.
    टी (T) लॅटरल्स : ९० अंशात कलेक्‍टर पाइपला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो.
    कपलर ः दोन पाइपचे तुकडे एकमेकांना जोडण्यासाठी कपलरचा उपयोग होतो.
    एन्डकॅप ः पाइपचे एका बाजूचे तोंड बंद करण्यासाठी वापरले जाते.
    वाय (Y) सांधा ः लॅटरल ९० अंशांपेक्षा कमी कोनामध्ये कलेक्‍टर पाइपला जोडताना याचा वापर होतो.
    इन्स्पेक्‍शन चेंबर ः प्रत्येक चार लॅटरल नंतर १ इन्स्पेक्‍शन चेंबर कलेक्‍टर पाइपवर बसवावा. यासाठी साडेतीन फूट व्यासाचे आणि ८ फूट खोलीचे सिमेंटचे चेंबर वापरावे. निचरा पद्धत व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
     
    संपर्क :  एस.डी. राठोड, ९८५०२३६१०३,
    (कृषी संशोधन केंद्र, डिग्रज, जि. सांगली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com