agriculture news in Marathi, report on drought from jalna District, Maharashtra | Agrowon

झळा दुष्काळाच्या : अॅग्रोवनची 'अॉन द स्पॉट' मालिका : जिल्हा जालना -2

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. खरिपाची पीक गेल्यात जमा असतानाच रब्बीची आशा मावळली आहे. दिवसभर वेचणी केल्यानंतर किमान गाडी बैलानं आणावा लागणारा कापूस आता गोणीत दुचाकीवर आणण्याची वेळ आली आहे. शिवारच्या शिवारं पावसाअभावी करपली असून प्रत्येक शिवारावर चिंतेचे मळभ दाटले आहे. काही दिवस कसं बसं भागलं पणं पुढच्या वर्षी पाऊस येऊन चारा पाण्याची सोय होईपर्यंत जगायचं कसं हा प्रश्न जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांच काहूर निर्माण करीत असल्याची स्थिती आहे. जलना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे.

<p>जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. खरिपाची पीक गेल्यात जमा असतानाच रब्बीची आशा मावळली आहे. दिवसभर वेचणी केल्यानंतर किमान गाडी बैलानं आणावा लागणारा कापूस आता गोणीत दुचाकीवर आणण्याची वेळ आली आहे. शिवारच्या शिवारं पावसाअभावी करपली असून प्रत्येक शिवारावर चिंतेचे मळभ दाटले आहे. काही दिवस कसं बसं भागलं पणं पुढच्या वर्षी पाऊस येऊन चारा पाण्याची सोय होईपर्यंत जगायचं कसं हा प्रश्न जालना जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नांच काहूर निर्माण करीत असल्याची स्थिती आहे. जलना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेने जालना जिल्ह्यातील मंठा वगळता जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या स्थितीविषयक निकषाप्रमाणे ट्रिगर (कळ) २ दाबली आहे. त्यानुसार प्रशासनाकडून दुष्काळाच्या सत्यमापनाचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. (video : Santosh Munde)</p>