agriculture news in marathi, Ghule brothers Natural farming and direct marketing of vegetables | Agrowon

घुले बंधूंची यशस्वी नैसर्गिक शेती ते थेट मार्केटिंग...

बुधवार, 19 डिसेंबर 2018

मांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले यांनी नोकरी सांभाळत वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारणा केली. दर शनिवार, रविवार बोरीऐंदी (ता. दौंड) येथील शेतीमध्ये घुले बंधू रमतात. नैसर्गिक शेती पद्धतीवर त्यांचा भर आहे. शेतकरी गट तयार करून थेट ग्राहकांना २५ प्रकारचा भाजीपाला घरपोच पुरविण्यात घुले बंधू यशस्वी झाले आहेत. पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये माधव आणि सचिन घुले नोकरी करतात. घुले बंधूंची मांजरी (ता. हवेली) येथे वडिलोपार्जित अर्धा एकर शेती आहे. सुरवातीच्या काळात शिक्षणामुळे त्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करता आले नाही.

<p>मांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले यांनी नोकरी सांभाळत वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारणा केली. दर शनिवार, रविवार बोरीऐंदी (ता. दौंड) येथील शेतीमध्ये घुले बंधू रमतात. नैसर्गिक शेती पद्धतीवर त्यांचा भर आहे. शेतकरी गट तयार करून थेट ग्राहकांना २५ प्रकारचा भाजीपाला घरपोच पुरविण्यात घुले बंधू यशस्वी झाले आहेत.&nbsp;पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये माधव आणि सचिन घुले नोकरी करतात. घुले बंधूंची मांजरी (ता. हवेली) येथे वडिलोपार्जित अर्धा एकर शेती आहे. सुरवातीच्या काळात शिक्षणामुळे त्यांना प्रत्यक्ष शेतीमध्ये काम करता आले नाही. मात्र पुढे जसा वेळ मिळेल त्यानुसार त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. १९८५ मध्ये त्यांच्या वडिलांनी बोरीऐंदी (ता. दौंड) येथे दहा एकर शेती खरेदी केली. सुटीच्या दिवशी घुले बंधू शेतीवर वडिलांना मदतीसाठी जायचे. त्या वेळी भाजीपाला, ऊस लागवडीवर भर होता. स्वत:च्या शिक्षणाचा खर्च, तसेच आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी माधव आणि सचिन यांनी मांजरी येथील अर्धा एकर शेतीमध्ये अडीचशे कोंबड्या आणि दहा शेळ्यांचे संगोपन सुरू केले. १९९८ मध्ये नोकरी सुरू झाल्यानंतर घुले बंधूंनी बोरीऐंदी येथील शेती वाट्याने करायला दिली. त्यामुळे सुमारे सहा वर्षे शेतीशी संपर्क कमी झाला होता. गेल्या वर्षी नातेवाइकांच्या ओळखीतून घुले बंधूंनी नोकरीचे उत्पन्न आणि बॅंकेतून कर्ज घेऊन कवठे (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथे दहा एकर शेती विकत घेतली. तेथे सहा एकर ऊस, एक एकर कांदा, तीन एकर गहू लागवड केली आहे.&nbsp;<br /> संपर्क : माधव घुले, ९९७५४४४२२२<br /> (Video : Amol Kute​)</p>