agriculture news in marathi, BE Mechanical Students research on crop spray pump | Agrowon

शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करणारे फवारणी यंत्र

गुरुवार, 27 डिसेंबर 2018

औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ई. मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी कीडनाशक फवारणी यंत्र बनविले आहे. सायकलरूपी असलेले हे यंत्र शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करण्यात परिणामकारक ठरेल असा विश्‍वास या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे. मूळचे चित्तेपिंपळगाव येथील रहिवासी व शेतकरी कुटुंबातील योगेश राजेंद्र गावंडे व निखिल भास्कर गावंडे अशी यंत्र बनविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असतांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या भावनेतून दोघांनीही चिंतन सुरू केले.

<p>औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ई. मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी कीडनाशक फवारणी यंत्र बनविले आहे. सायकलरूपी असलेले हे यंत्र शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करण्यात परिणामकारक ठरेल असा विश्‍वास या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे. मूळचे चित्तेपिंपळगाव येथील रहिवासी व शेतकरी कुटुंबातील योगेश राजेंद्र गावंडे व निखिल भास्कर गावंडे अशी यंत्र बनविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असतांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या भावनेतून दोघांनीही चिंतन सुरू केले. या चिंतनातून त्यांना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खुरपणी व फवारणीच्या समस्या, त्यावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेरचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामधून दोघांनीही फवारणी यंत्राचे कायम पाठीवर असणारे ओझे कमी करता येईल का, याचा विचार सुरू केला. त्यामधून सायकलचा सांगाडा, चाक व त्यावर फवारणी यंत्र अशी संकल्पना त्यांच्या मनाला भावली. त्यामधून साकारलेले त्यांचे हे यंत्र वापरताना पाठीवर घेऊन फवारणी करण्याची गरज नाही. (video : santosh munde)</p>