जागतिक मधमाशी दिनानिमित्त बारामतीत आज कार्यक्रम

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) व क्रॉफ लाईफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशीपालनातील ‘मधुसंदेश’ हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प बारामती परिसरात यशस्वी राबवण्यात आला.
जागतिक मधमाशी दिनानिमित्त  बारामतीत आज कार्यक्रम

पुणे : जागतिक मधमाशी दिनाचे अौचित्य साधून आज (ता. १९) बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे मधुसंदेश प्रकल्पांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर २३ शेतकऱ्यांसह तीन पत्रकारांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.        बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) व क्रॉफ लाईफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मधमाशीपालनातील ‘मधुसंदेश’ हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प बारामती परिसरात यशस्वी राबवण्यात आला. बारामती केव्हीके रौप्यमहोत्सवी वर्षातही पदार्पण करीत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती येथील आप्पासाहेब पवार सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, ‘आयसीएआर’चे सहायक महासंचालक (पीक संरक्षण) डॉ. पी. के. चक्रवर्ती, ‘आयसीएआर’च्या मधमाशी व परागीभवन कीटक विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. राजकुमार ठाकूर, ‘क्रॉप लाईफ इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ब्रीज अोबेरॉय, ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती’चे अध्यक्ष राजेंद्र पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती केव्हीकेचे प्रमुख डॉ. सय्यद शाकीर अली यांनी दिली आहे.  या वेळी १९ डाळिंब उत्पादक, एक कलिंगड व तीन सूर्यफूल उत्पादक अशा २३ शेतकऱ्यांचा मधुसंदेश प्रकल्पांतर्गत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट पत्रकारितेसाठी ॲग्रोवनचे उप मुख्यउपसंपादक मंदार मुंडले व ‘सकाळ’चे बारामती येथील बातमीदार ज्ञानेश्वर रायते यांचाही पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.     

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com