शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा : कृषिमंत्री डॉ.बोंडे | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांनी गटशेतीचा पर्याय अवलंबावा : कृषिमंत्री डॉ.बोंडे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी या पर्यायाचा अवलंब करावा. शासन सवलती आणि अनुदान योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गव्हाणकुंड येथे केले. 

वरुड-टेंभूरखेडा, गव्हाणकुंड-बहादा, जरुड-मांगरुळी, काचुर्णा-नांदगाव या १४५ कोटी ३२ लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकूण १४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

अमरावती :‘‘गटशेती ही काळाची गरज असून; शेतकऱ्यांनी या पर्यायाचा अवलंब करावा. शासन सवलती आणि अनुदान योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी गव्हाणकुंड येथे केले. 

वरुड-टेंभूरखेडा, गव्हाणकुंड-बहादा, जरुड-मांगरुळी, काचुर्णा-नांदगाव या १४५ कोटी ३२ लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकूण १४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन डॉ. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

डॉ. बोंडे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. शेतीमध्ये व्यावसायिकता आणली, तरच ती फायद्याची होईल. त्याकरिता संरक्षित सिंचनाचे पर्याय उपलब्ध करून घ्यावे. अशा शेतीत नंतर व्यावसायिक पिकांची लागवड करावी. त्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास केल्यास विपणनदेखील सोपे होते. गावात एकाच शेतकऱ्याने व्यावसायिक पीक घेतल्यास विपणनाची अडचण निर्माण होते. दूरच्या बाजारपेठेत शेतीमाल पाठविण्याची वेळ आल्यास वाहतुकीवर मोठा खर्च होतो. हे टाळण्यासाठी गटशेतीवर भर द्यावा.’’ 

‘‘गावात एकाच पिकाखाली क्षेत्र वाढल्यास आणि दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेतल्यास व्यापारी सुद्धा अशा गावांमध्ये थेट खरेदीसाठी पोचतात. त्यामुळे गटशेतीतून अनेक फायदे होत असल्याने या पर्यायाचा अवलंब अधिकाधिक व्हावा. शेतीमालावर प्रक्रियेचे प्रकल्प स्थानिक स्तरावर उभारल्यास त्यातूनही चार पैसे मिळण्यास आणि गावातील युवकांना रोजगार उपलब्धतेचा पर्याय उपलब्ध होईल. गव्हाणकुंड भागात सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी प्रस्तावित आहे. लवकरच या कामाला सुरवात होईल. शेकदरी धरणावरून पाइपलाइनने शेतापर्यंत पाणी जाईल,’’ असेही डॉ. बोंडे यांनी सांगितले.

‘‘जिल्ह्याला २०० पॅकहाउस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल. शेतकरी बांधवांसह शेतमजुरांसाठी विमा, शिक्षण, आरोग्य योजना कृषी विभागाकडून राबविण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले. सरपंच सुमित्रा मुरुमकर यांच्यासह प्रगती महिला संघाच्या सदस्या या वेळी उपस्थित होत्या.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...