महाराष्ट्रातून धावली १ हजारवी किसान रेल्वे

शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली आहे. देशातील विविध बाजारांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल वेळेवर पाठविण्यासाठी किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे.
Kisan Rail
Kisan Rail

नवी दिल्ली - शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे (Kisan Rail) सुरू केली आहे. देशातील विविध बाजारांमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल (Agri Produce) वेळेवर पाठविण्यासाठी किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनली आहे. या योजनेतील १००० वी किसान रेल्वे (1000 Kisan Rail) बुधवारी (ता.३) धावली. महाराष्ट्रातील सावदा येथून दिल्लीतील आदर्श नगर या मार्गावर ही रेल्वे धावली. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर, (Narendra Singh Tomar) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून मध्य रेल्वेच्या किसान रेल्वेची हजारावी फेरी रवाना केली.  

हेही वाचा - पाच हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन पेरणी कोरोनामुळे (Covid19) देशातील लावलेल्या लॉकडाऊनचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल (Perishable commodities) योग्यवेळी योग्य ठिकाणच्या बाजारपेठेत पोहचत नसल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही बसत होता. मात्र, किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशातील विविध बाजारांमध्ये पाठवणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतमाला वाहतूकीची समस्या दूर झाली असून दुसरीकडे ग्राहकांना ताजी फळे (Fruits) आणि भाजीपाला (Vegetables) मिळत आहे.

मध्य रेल की 1000वीं किसान रेल सेवा का आज केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी के साथ वीडियो कॉन्फ़्रेंसिंग के माध्यम से हरी झंडी दिखाकर शुभारंभ किया... यह सेवा महाराष्ट्र के सावदा से आदर्श नगर दिल्ली के लिए प्रारम्भ की गई।है... pic.twitter.com/p9a7Jyb9Oo

— Narendra Singh Tomar (@nstomar)

  महाराष्ट्रातील सावदा येथून निघून दिल्लीतील आदर्श नगर येथे ४५३ टन केळी पाठवण्यात आली. मध्य रेल्वेच्या किसान रेल्वे द्वारे आतापर्यंत ३.४५  लाख टन शेतमालाची वाहतूक झाली आहे. कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. फळे आणि भाज्या यांच्यासारख्या नाशवंत शेतमालाला चांगला भाव मिळावा, यासाठी किसान रेल्वेच्या माध्यमातून किफायतशीर दरात शेतकऱ्यांचा शेतमाला दूर अंतरावरील बाजारात पोहोचविला जात असल्याचे कृषिमंत्री (Agriculture Minister) तोमर यावेळी म्हणाले.    

देश के किसानों की प्रगति को समर्पित @Central_Railway की 1000वीं किसान रेल को श्री @nstomar जी के साथ हरी झंडी दिखाकर रवाना किया।#SamruddhKisan pic.twitter.com/pCsxuiTIqj

— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw)

तर केंद्रीय रेल्वेमंत्री (Union Railway Minister) वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांनी नेहमीच शेतकऱ्याला प्रत्येक उपक्रमाला केंद्रस्थानी ठेवले आहे आणि त्यांच्या भल्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यावेळी त्यांनी जळगावच्या केळ्यांना (Jalgaon Banana) जीआय मानांकन (GI Indicaton Tag) मिळाल्याचा अभिमानाने उल्लेख करत त्यांनी जळगावच्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. याशिवाय शेतकऱ्यांनी सुधारणेसाठीच्या सूचना सादर करण्याचे  आवाहन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com