जमीन सपाटीकरणासाठी लेझर लॅंड लेव्हलर

लेझर लेव्हलर
लेझर लेव्हलर

लेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते. लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत काम करू शकतो.

आजही आपल्याकडे ३५ ते ४० टक्के क्षेत्र पृष्ठभाग सिंचन पद्धतीवर अवलंबून आहे. पृष्ठभाग सिंचन पद्धतीमध्ये २५ टक्‍क्यांपेक्षा जास्त पाण्याचा अपव्यय होतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जमिनीचा पृष्ठभाग समतल असणे आवश्‍यक आहे. यासाठी लेझर लॅँड लेव्हलर यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

जमीन असमतोल असल्याचे तोटे

  • जमिनीच्या असमतोल पृष्ठभागाचा सिंचन पद्धतीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
  • जमिनीच्या पृष्ठभागाच्या असमान पातळीचा अंकुरण, वाढ आणि उत्पादनावर परिणाम होतो.
  • मानवी शक्ती व ऊर्जाचा अधिक प्रमाणात वापर.
  • आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास अडथळा.
  • मातीची धूप व पाण्याचा अपव्यय जास्त प्रमाणात.
  • मशागत तसेच पिकाच्या वाढीसाठी लागणाऱ्या विविध कामांची गती मंदावते.
  • लेझर लेव्हलरचे कार्य

  • लेझर लेव्हलर जमिनीच्या उंच भागातील माती कमी उंचीच्या भागाकडे अचूक व काटेकोरपणे हलवून जमिनीच्या पृष्ठभागाचे समतलीकरण करण्यासाठी मदत करतो.
  • लेझर लेव्हलरमध्ये मुख्यतः लेझर इमिटर, लेझर सेंन्सर, इलेक्‍ट्रॉनिक आणि हायड्रॉलिक नियंत्रण प्रणाली आणि ड्रॅग बकेट यांचा समावेश असतो.
  • लेझर ट्रान्समीटर शेताच्या अशा ठिकाणी ठेवावा, की जेणेकरून लेझर सेंन्सरला प्रकाश झोत मिळण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही. लेझर सेंन्सर व लेझर इमीटरमधील अंतर १०० मीटरपेक्षा जास्त ठेवू नये.
  • लेझर ट्रान्समीटर हा जमिनीच्या ०.०१ टक्के ते १५ टक्के उतारापर्यंत काम करू शकतो.
  • लेझर सेंन्सर हा ड्रॅग बकेटवर बसवलेला असतो. कंट्रोल पॅनेलच्या मॅन्युअल मोडचा वापर करून बकेटची स्थिती जमिनीच्या आवश्‍यक पातळीनुसार निश्‍चित करावी. बकेटच्या याच स्थितीमध्ये लेसर सेंन्सर लेझर ट्रान्समीटरच्या समपातळीत करून घ्यावा आणि नियंत्रण प्रणाली म्यॅन्युएल मोडमधून स्वयंचलित पद्धतीमध्ये बदलून घ्यावी. या कार्यप्रणालीनुसार लेझर लेव्हलर उंच-सखल भागानुसार माती हलवून जमीन समपातळीत करतो.
  •  लेझर लेव्हलरचे फायदे

  • लेझर लॅंड लेव्हलर हे एक आधुनिक व अचूक यंत्र आहे, जे जमिनीचे स्वयंचलितरित्या समतलीकरण करते.
  • जमीन समतल असल्यामुळे ओलावा टिकून राहातो. पीक वाढीला फायदा होतो.
  • पिकाची उत्पादनक्षमता ३०  टक्‍क्‍यांपर्यंत वाढते.
  • सिंचनासाठी लागणारे इंधन, विजेची बचत होते.
  • सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची २०-२४ टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com