| Agrowon

बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी द्राक्षबागांना पावसामुळे मोठा फटका

मुकुंद पिंगळे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

दुष्काळी परिस्थितीत बागा जगविल्या. मात्र पावसामुळे फुलोरा व पोंग्याच्या अवस्थेतील घडांना फटका बसला आहे. त्यामुळे चालू वर्षी अपेक्षित उत्पादन मिळणार नाही व निर्यातीवर परिणाम होणार आहे.
- खंडेराव शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. बागलाण

नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी कसमाडे पट्ट्याची ओळख आहे. १५०० एकर क्षेत्रावर हंगाम घेण्यात येते. हंगामात १५ हजार टन माल सर्वसाधारणपणे तयार होतो. त्यापैकी ५ हजार टन माल निर्यात होतो. मात्र बागलाण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चालू हंगामातील द्राक्षबागांना मोठा फटका बसला असून, उत्पादन ३५ ते ४० टक्क्यांनी घटण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनासह द्राक्षाच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे चालू हंगामात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

दरवर्षी जून-जुलै महिन्यात छाटणी करून पूर्वहंगामी अर्ली हंगाम घेण्यात बागलाण तालुका प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथील द्राक्षाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र झालेला मुसळधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तयार द्राक्ष घडांचा फुलोरा कुजला असून, यांसह तयार झालेले घड जिरून व कूज झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात पाऊस सुरू असल्याने फवारण्या करताना अडचणी आल्या. फ्लॉवरिंग अवस्थेतील बागांचा घडांची कूज व द्राक्षवेलीची प्रतिकारशक्ती कमी झाल्याने नुकसान बघावयास मिळत आहे. त्यामुळे घडांची संख्या घटली आहे.

पानांची क्रिया सुरू ठेवण्यासाठी वेलीचे संगोपन यासाठी खर्च करावा लागणार आहे, असे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. चालू वर्षी दुष्काळाचा मोठा सामना करून द्राक्ष उत्पादकांनी बागा जगविल्या. त्यामुळे पाण्याचा ताण वेलींना पडला आहे. त्यामुळे चालू हंगामात २० ते २५ टक्के परिणाम होण्याची शक्यता असताना पावसामुळे उत्पादन घटण्याची पातळी ३५ ते ४० टक्क्यांवर जाणार आहे. 

पावसामुळे मोठा फटका बसला असून, या पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मुंगसे, पिंगळवाडे, भुयाने, लाडूद, गोराणे, आसखेडा, डोंगरेज, आखतखेडे, दसाने, जायखेडा, द्याने, टेंभे, ताहाराबाद, पिंपळकोठे भागांतील द्राक्ष उत्पादकांना फटका बसला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व वरिष्ठ कृषी अधिकारी यांनी दखल घेऊन पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.

युरोप, रशिया द्राक्ष निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता 
दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये युरोप, रशिया या देशांमध्ये ख्रिसमस या सणासाठी द्राक्ष निर्यातीची मोठी संधी असते. यामुळे अर्ली हंगाम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादन घेणारा नाशिक जिल्ह्यातील बागलाणची राज्यात देशात वेगळी ओळख आहे. मात्र नैसर्गिक अपात्तीमुळे उत्पादन घटणार असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा फटका बसणार आहे. 

प्रतिक्रिया
बागलाण तालुक्यातील द्राक्ष उत्पादक अर्ली द्राक्षबागा घेण्यात माहीर आहेत. परंतु शासनाचे बाराही महिने विमा कवच नसल्याने उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने बाराही महिने विमा कवच संरक्षणाची तरतूद करावी अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.
- कृष्णा भामरे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग

 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...