| Agrowon

आंबेगाव तालुक्यात चार टॅंकरव्दारे होणार पाणीपुरवठा

मंगळवार, 30 जून 2020

पुणे   ः उन्हाच्या झळा वाढत असून आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. तालुक्यातील माळीण, आमडे गावठाण व वाड्यावस्त्या, तिरपाड गावठाण व वाड्यावस्त्या, फलोदे गावठाण व वाड्यावस्त्या तसेच निघोटेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील गावांना चार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा दोन ते तीन दिवसांत सुरू केला जाणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.

पुणे   ः उन्हाच्या झळा वाढत असून आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे. तालुक्यातील माळीण, आमडे गावठाण व वाड्यावस्त्या, तिरपाड गावठाण व वाड्यावस्त्या, फलोदे गावठाण व वाड्यावस्त्या तसेच निघोटेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील गावांना चार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा दोन ते तीन दिवसांत सुरू केला जाणार आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयात असलेल्या आदिवासी भागातील विविध गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आदिवासी महिलांना डोंगरदऱ्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. माळीण, आमडे गावठाण व वाड्यावस्त्या,तिरपाड गावठाण व वाड्यावस्त्या, फलोदे गावठाण व वाड्यावस्त्या तसेच निघोटेवाडी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दस्तुरवाडी येथील गावांना चार पाणी पुरवठा करण्यासाठी टॅंकरची मागणी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि पंचायत समितीकडे केली होती.

त्यानुसार तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांमार्फत टॅंकर मंजुरीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. यासंदर्भात मंत्री वळसे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना
सूचना करून पिण्याच्या पाण्याच्या टँकरबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे कळविले होते. मंगळवारी (ता.२१) जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी मंजुरी दिली असल्याचे उपसभापती संतोष भोर यांनी सांगितले. या संबधित गावांना पाणीपुरवठा येत्या दोन दिवसांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल,
अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...