ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ नवी वसतिगृहे उभारणार

राज्यातील इतर मागास (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्यासंदर्भात आमदार समाधान अवताडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे.
Vijay-Wadettiwar
Vijay-Wadettiwar

इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे एकूण ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार असून या वसतीगृहांचा (Hostels) प्रस्ताव वित्त विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास वर्ग कल्याणमंत्री (Minister of Other backward class welfare) विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली आहे. 

राज्यातील इतर मागास (OBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे बांधण्यासंदर्भात आमदार समाधान अवताडे (Samadhan Autade) यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) बोलत होते. 

विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक निधीमधून राज्यातील इतर मागासवर्गातील इयत्ता दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी ३६ वसतीगृहे (Hostels) सुरु करण्याचा निर्णय ३० जानेवारी २०१९ रोजी घेतला होता. 

व्हिडीओ पहा 

या वसतीगृहांसाठी (Hostels) जमीन उपलब्ध झालेल्या नागपूर, अहमदनगर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांचे प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. केंद्राने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून सुधारित प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. चार जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये जागा किंवा इमारतींच्या उपलब्धतेविषयी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य शासनाने ७२ वसतीगृहे (Hostels) बांधण्याची घोषणा केली असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com