Abinesh left the high profile job of IT company and started dairy work in Jammu | Agrowon

शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची नोकरी सोडून करतोय डेअरी व्यवसाय

वृत्तसेवा
शनिवार, 15 जानेवारी 2022

जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी एका तरुणानं धाडसी पाऊल उचलल आहे. या तरूणानं त्याची भरघोस पगाराची नोकरी सोडून डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. 

वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी एका तरुणाने हे धाडसी पाऊल उचलले आहे. या तरूणाने त्याची भरघोस पगाराची नोकरी सोडून डेअरी व्यवसाय (Dairy Bussiness) सुरू केला आहे. आता हा तरूण आयटी कंपनीतली (IT Company) नोकरी सोडून स्वत:चा दूध व्यवसाय करत आहे. अबिनीश खजुरिया (Abineesh Khajuria) असे या तरूणाचे नाव आहे. त्याचा आता जम्मूमध्ये एक मोठा गोठा (Cowshed) आहे.

हेही वाचा - सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' गाडीचा आविष्कार

तिथे जवळपास शंभर एक गाई आहेत. अबिनीशच्या या धाडसी पावलाचा त्याच्या वडिलांनाही सार्थ अभिमान आहे. घरातूनच शेतीचे बाळकडू मिळालेल्या अबिनीशचे वडील कुलभूषण खजुरिया (Kulbhushan Khajuria) यांनी दुग्ध व्यवसायात नाव कमावले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केवळ ५-६ गायी होत्या. त्यानंतर २०१५ साली त्यांनी १५ गायींपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सुरूवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी न डगमगता हा आपला व्यवसाय उभा केला. आज त्यांच्याकडे ९७ गायी असून त्यातल्या ४० दुभत्या आहेत.

शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा -  
आजकालच्या तरूणांचा ओढा अंगमेहनतीपेक्षा चांगला जॉब करण्याकडे असतो. क्वचितच एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा शेती करताना दिसतो. पण मुळात एखाद्या विषयात आवड असेल तर ती व्यक्ती त्या कामाकडे वळते.  कुलभूषण यांचा मुलगा अबिनीश संगणक शास्त्रामध्ये (Computer Science) पदवी घेतल्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. मात्र, त्याचा कल वडिलांच्या दुग्ध व्यवसायाकडे होता. आज तो त्याच्या वडिलांसोबत डेअरीचे कामही सांभाळत आहे. कुलभूषण यांचे वडीलही शेतकरी होते. ज्यांच्याकडून ते शेती शिकले. आता त्यांचा मुलगाही शिकून सवरून शेतकरी झाला आहे.

तरूणांना मिळाला रोजगार -
अबिनीश काम पाहत असलेल्या डेअरीमुळे जवळपास पंधरा तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार (Empolyment) मिळाला आहे. मोठ्या संख्येने गोठ्यात गायी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेणखतही मिळते. यापासून ते गांडूळ खत तयार करतात. आज त्यांच्या गोठ्यात एचएप, जर्सी, साहिवाल (Sahiwal) आणि गीर (Gir) जातीच्या गायी आहेत. याशिवाय दैनंदिन कामासाठी मिल्कींग मशिन, (Milking Machine) मिल्क कुलर, (Milk Cooler) रेशन मिक्श्चर मशिन (Ration Mixture Machine) यांसारखी आधुनिक यंत्रे (Modern machinery) त्यांच्याकडे आहेत.


इतर कृषिपूरक
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...
खुडूक कोंबडी कशी ओळखावी?अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः...
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...