जनावरांच्या शिंगावरून वय ओळखा

पशुपालन व्यवसाय सुरु करताना नवीन जनावर खरेदी करतेवेळी बाह्य रूपावरून त्यांचे योग्य वय ओळखणे फार महत्त्वाचे आहे.
Age Identification of Animal By Numbers of Horn Rings
Age Identification of Animal By Numbers of Horn Rings

पशुपालन व्यवसाय सुरु करताना नवीन जनावर खरेदी करतेवेळी बाह्य रूपावरून त्यांचे योग्य वय ओळखणे फार महत्त्वाचे आहे. सोबतच जनावरांना औषधोपचार करतेवेळी तसेच विमा उतरवताना देखील त्यांच वय माहिती असणे गरजेचे आहे. 

जनावरांच्या वाढत्या वयाबरोबर जनावरांच्या शिंगांवर कडा किंवा वलय (Horn Rings) दिसू लागतात. जन्मापासून वयाच्या अडीच ते तीन वर्षापर्यंत शिंगावर एक वलय दिसते. त्यानंतर वर्षाला एक अशी वाढ होत असते.

हेही पाहा -  जनावरांची शिंगे काढून टाकण्याचे फायदे आणि तोटे

सुत्रानूसार जनावरांचे वय काढण्यासाठी शिंगावरील वलयांची संख्या अधिक (+2)दोन याप्रमाणे काढता येते. परंतु शिंगे काढली असतील किंवा शिंगकळी (Horn Buds) जाळली असल्यास, तसेच प्रदर्शनावेळी किंवा बैलपोळ्याला शिंगे रंगवली किंवा घासली असल्यास शिंगावरून वय ओळखण्याची पद्धत अपयशी ठरते. तसेच काही जनावरांच्या जातीमध्ये शिंगांचा आकार लहान असल्यास, वलय बघणे अवघड जाते. तुम्ही जनावरांच्या जन्मापासूनच्या नोंदी ठेवत असाल तर अशी कोणती पद्धत अवलंबण्याची गरज नाही. तुम्हाला जनावरांचे अचूक वय कळून जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com