agiculture news in marathi, fluctuation in temperature | Agrowon

तापमानात चढ-उतार सुरुच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. दोन दिवस उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ-उतार शक्य आहे. आज (ता. २७) रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह दिवसाचे कमाल तापमानही कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल, किमान तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. दोन दिवस उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता असल्याने तापमानात चढ-उतार शक्य आहे. आज (ता. २७) रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र आकाशासह दिवसाचे कमाल तापमानही कमी-अधिक होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

जम्मू काश्मीर, पंजाब, हरियणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत (ता. २८) गारपिटीसह हलका पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. यातच अफगाणिस्तान आणि परिसरावर असलेल्या पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे पश्चिम राजस्थानमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. यातच अाेडिशापासून उत्तरअंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी   कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. यातच गुजरात किनाऱ्यालगत अरबी समुद्राच्या ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. 
पश्चिमेकडून वाहणाऱ्या या वाऱ्यामुळे राज्याच्या तापमानात १ ते २ घट झाली आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळी हवेत गारठा होता. धुळे येथील कृषी महाविद्यालयात किमान तापमान १२.८ अंशांपर्यंत खाली आले आहे. तर दोन दिवसांपर्वी राज्यात अनेक ठिकाणी ३७ अंशांवर गेलेले दिवसाचे तापमान ३४ ते ३६ अंशांपर्यंत कमी झाले होते. मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

मंगळवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६ (१४.०), नगर - (१३.४), जळगाव ३४.० (१६.०), कोल्हापूर ३५.४ (१८.७), मालेगाव ३९.२ (१६.८), नाशिक ३१.७ (१५.६), सांगली ३६.४ (१५.३), सातारा ३६.४ (१५.०), सोलापूर ३७.१ (१८.६), अलिबाग २८.९ (२०.०), डहाणू २९.६ (१८.०), सांताक्रूझ ३३.१ (२०.०), रत्नागिरी ३२.५ (१९.८), औरंगाबाद ३३.० (१७.०), बीड ३२.९, नांदेड ३८.५ (१६.५), उस्मानाबाद ३६.१ (१७.६), परभणी ३५.५ (१६.३), अकोला ३५.८ (१७.१), अमरावती ३५.० (१७.२), बुलडाणा ३०.६ (१६.८), चंद्रपूर ३६.० (१५.२), गोंदिया ३५.० (२०.२), नागपूर ३५.१ (१५.३), वर्धा ३१.५ (१६.३), यवतमाळ ३४.० (१७.४). 


इतर अॅग्रो विशेष
बारामतीत अवतरले ‘अॅग्रोवन मार्ट’बारामती, जि. पुणे : शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची...
औरंगाबादेत होणार अंडीपुंजनिर्मिती केंद्रऔरंगाबाद : रेशीम शेती व उद्योगाला चालना...
गोंदियात किमान तापमान १० अंशांवरपुणे : उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब उत्तर...
शेतकऱ्यांच्या २६ च्या ‘ट्रॅक्टर परेड’...नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कृषी...
केंद्राच्या स्पष्ट धोरणाअभावी ‘जीएम’...नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या...
लोक सहभागातून जैवविविधता, पर्यावरण...ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनामध्ये पाच...
अपात्र लाभार्थ्यांना कोणी केले मालामाल?ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला...
ग्लोबल अन् लोकल मार्केटमका आणि सोयाबीनच्या जागतिक उत्पादनात घट होण्याची...
निर्णय आता तुमच्या हाती : केंद्र सरकारनवी दिल्ली ः शेतकरी नेते ‘कृषी कायदे रद्द करणे...
शेतमाल निर्यात खर्च झाला दुप्पट नाशिक : लंडनमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाचा नव्या...
बर्ड फ्लूने १३ हजार पक्ष्यांचा मृत्यू पुणे : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू...
कृषिपंपाच्या थकबाकीची आता ऊसबिलातून...सोलापूर :  कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी आणि...
थंडी कायम राहण्याची शक्यता पुणे ः कोरड्या झालेल्या वातावरणामुळे राज्यातील...
चॉकलेट्‌स......नव्हे गुळाचे जॅगलेट्‌सकोल्हापुरी प्रसिद्ध गूळ देश-परदेशातील बाजारपेठेचा...
‘जय सरदार’ कंपनीची उल्लेखनीय घोडदौडमलकापूर (जि. बुलडाणा) येथील ‘जय सरदार’ शेतकरी...
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...