किमान तापमानात घट, थंडीत वाढ होईल

आठवड्याचे हवामान
आठवड्याचे हवामान

महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे सध्याचे थंडीचे प्रमाण या आठवड्यात कायम राहील. काश्‍मीर, राजस्थानवर १०१६ हेप्टापास्कल तसेच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, अरुणचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम व आसामवर तितकाच हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीचे प्रमाण उत्तर भारतात मध्यम स्वरूपाचे राहील. केरळ व तमिळनाडू प्रदेशावर थंडीचे प्रमाण कमी राहील. २३ डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंडीची तीव्रता कायम राहील तर कोकण, मध्यमहाराष्ट्र व मराठवाड्यावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल. वाऱ्याची दिशा आणि हवेच्या दाबाची स्थिती पाहता राजस्थान, गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंड वारे मोठ्या प्रमाणात येतील आणि सध्याची थंडी कायम राहील. मात्र त्याच दिवशी २३ डिसेंबर रोजी काश्‍मीर व हिमालयाच्या पायथ्याशी हवेच्या दाबात वाढ होत असून, काश्‍मीर, सिमला भागात बर्फवृष्टी होईल. त्यामुळे विदर्भात थंडी वाढेल.

२४ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीचे प्रमाण अधिक होईल. राजस्थानवर १०१८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब होईल तेथे थंडी वाढेल. आणि वारा त्यादिशेने वाहण्यामुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण अधिक होईल. २५ डिसेंबर रोजी विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण अधिक तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांतही ते तितकेच अधिक असेल. मात्र नंदूरबार, नाशिक व पश्‍चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम राहील. २६ डिसेंबर रोजी मध्य व पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्यात थंडीचे प्रमाण वाढेल तर उत्तर महाराष्ट्रात ते मध्यम स्वरूपाचे आणि कोकणात व मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होईल. २७ व २८ डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे आणि मध्य व पूर्व विदर्भ व मराठवाड्यात ते अधिक राहील. समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान सामान्य राहील. कोकण ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात ते ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ टक्के पर्यंत राहील, तर रत्नागिरी जिल्ह्यात ५७ टक्के राहील. आणि ठाणे व रायगड जिल्ह्यांत ६८ ते ७१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा र्इशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. उत्तर महाराष्ट्र नंदूरबार जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि नाशिक व धुळे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. नंदूरबार जिल्ह्यात किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस आणि धुळे जिल्ह्यात ते ९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ६९ टक्के राहील. धुळे जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील. नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ३७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. मराठवाडा उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. परभणी व बीड जिल्ह्यांत ते २९ अंश सेल्सिअस राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील तर लातूर व हिंगोली जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहील तर लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर जिल्ह्यात ८५ टक्के राहील. उस्मानाबाद, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७९ टक्के राहील. नांदेड, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता परभणी जिल्ह्यात ५७ टक्के राहील तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४९ टक्के राहील. हिंगोली जिल्ह्यात ४१ टक्के आणि उर्वरित लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ती २४ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत ११ किलोमीटर राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात ते २८ अंश सेल्सिअस राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलढाणा व अकोला जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलढाणा जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील, तर अमरावती जिल्ह्यात ती ४४ टक्के राहील. आणि अकोला व वाशीम जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५२ टक्के राहील. अकोला जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ टक्के राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील व बुलढाणा जिल्ह्यात ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. मध्य विदर्भ वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील तर यवतमाळ जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५५ टक्के राहील तर दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ३५ टक्के व वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १९ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही. पूर्व विदर्भ भंडारा जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर गोंदिया जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते २८ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ते १२ ते १३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात ५५ टक्के राहील तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ६० टक्के राहील. भंडारा जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ टक्के राहील, तर भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर सर्वच जिल्ह्यांत राहील. पावसाची शक्‍यता नाही. सोलापूर व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सांगली व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील तर सोलापूर जिल्ह्यात ते १५ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तसेच सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात किमान तापमान ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नगर व सोलापूर जिल्ह्यांत ४३ ते ४९ टक्के राहील, तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ७७ ते ७८ टक्के राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ६८ टक्के आणि सांगली जिल्ह्यात ८४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ४४ ते ४५ टक्के राहील. नगर जिल्ह्यात २८ टक्के तसेच सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यांत ३० ते ३९ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ किलोमीटर राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत तो ७ ते ९ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील. या आठवड्यात पावसाची शक्‍यता नाही. ----- कृषी सल्ला

  • थंडीपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी बागेत ठिकठिकाणी काडीकचरा ढीग करून पहाटे जाळल्यास धूर झाल्याने तसेच बागेचे तापमान १ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढवणे शक्‍य होते.
  • गहू, हरभरा, मका, जवस इत्यादी रब्बी पिकांना सायंकाळी पाणी दिल्यास जमिनीचे तापमान योग्यप्रकारे राखण्यात मदत होते.
  • कुक्कुटपालन शेडमध्ये पक्ष्यांना योग्य तापमान मिळावे म्हणून रात्री बल्ब चालू ठेवल्यास काही प्रमाणात उबदार वातावरण तयार होते.
  • मोठी जनावरे, दुभती जनावरे शक्‍यतो बंदिस्त शेडमधे बांधावीत म्हणजे थंडीपासून त्यांचे संरक्षण होई
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ आणि सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com