परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून अर्थशास्त्रीय परिषद

परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून अर्थशास्त्रीय परिषद
परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून अर्थशास्त्रीय परिषद

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता.२१) ते रविवार (ता.२२) या कालावधीत परभणी येथे २२व्या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे.  या परिषदेचे उद् घाटन शनिवारी (ता.२१) सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये होणार आहे. केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष डॉ. अशोक दलवाई उद्घघाटक आहेत. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी राहतील. राज्‍य कृषीमूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दोनदिवसीय परिषदेमध्ये देशातील; तसेच राज्‍यातील शंभरपेक्षा जास्‍त कृषी शास्‍त्रज्ञ सहभागी होणार आहेत. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करणे, कृषी विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषी विपणन धोरण, शेतमाल मूल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. रविवारी (ता.२२) या परिषदेचा समारोप हैदराबाद येथील राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.  या परिषदेत शेतकऱ्यांसाठी शेती या विषयावर डॉ. अशोक दलवाई; तर भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर डॅा. के. सी. गुम्‍मागोलमठ यांची व्‍याख्‍याने होणार असल्‍याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ. दिगंबर पेरके, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com