agirculture news in marathi Parbhani University to hold agriculture economic conference from saturday | Agrowon

परभणी कृषी विद्यापीठात शनिवारपासून अर्थशास्त्रीय परिषद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता.२१) ते रविवार (ता.२२) या कालावधीत परभणी येथे २२व्या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. 

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अर्थशास्‍त्र विभाग आणि महाराष्‍ट्र कृ‍षी अर्थशास्‍त्र संस्‍था यांच्‍यातर्फे शनिवार (ता.२१) ते रविवार (ता.२२) या कालावधीत परभणी येथे २२व्या राष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. 

या परिषदेचे उद् घाटन शनिवारी (ता.२१) सकाळी १० वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये होणार आहे. केंद्र सरकारच्‍या राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करणे समितीचे अध्‍यक्ष डॉ. अशोक दलवाई उद्घघाटक आहेत. कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी राहतील. राज्‍य कृषीमूल्‍य आयोगाचे अध्‍यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या दोनदिवसीय परिषदेमध्ये देशातील; तसेच राज्‍यातील शंभरपेक्षा जास्‍त कृषी शास्‍त्रज्ञ सहभागी होणार आहेत. सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्‍पन्न दुप्‍पट करणे, कृषी विकासाचे सामाजिक-आर्थिक मानके, सुधारित कृषी तंत्रज्ञानाचा परिणाम, कृषी विपणन धोरण, शेतमाल मूल्‍य धोरण आदी विषयांवर सहभागी शास्‍त्रज्ञ संशोधन लेखांचे सादरीकरण करणार आहेत. रविवारी (ता.२२) या परिषदेचा समारोप हैदराबाद येथील राष्‍ट्रीय कृषी विस्‍तार व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे (मॅनेज) संचालक डॉ. के. सी. गुम्‍मागोलमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

या परिषदेत शेतकऱ्यांसाठी शेती या विषयावर डॉ. अशोक दलवाई; तर भारतीय शेतमाल बाजारपेठ सुधारणा यावर डॅा. के. सी. गुम्‍मागोलमठ यांची व्‍याख्‍याने होणार असल्‍याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशोर देशमुख, मुख्‍य आयोजक डॉ. दिगंबर पेरके, महाराष्ट्र कृषी अर्थशास्त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. प्रकाश महिंद्रे यांनी दिली.


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...