संयुक्त राष्ट्र संघाच्या जनरल असेंब्लीच्या ७४ व्या अधिवेशनात २०२१ हे ‘आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीप
ताज्या घडामोडी
राज्यातील पंचायत समिती सभापतींच्या निवडी २० नंतरच
पुणे : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या शुक्रवारनंतरच (ता. २०) होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता. ९) सांगितले.
पुणे : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या शुक्रवारनंतरच (ता. २०) होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता. ९) सांगितले.
पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडीबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. शिवाय, नियोजित कार्यक्रमानुसार येत्या शुक्रवारी (ता. १३) सभापतींच्या निवडी केल्या जाणार नाहीत. परिणामी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना आपोआपच आणखी एक आठवड्याची मुदतवाढ मिळणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच पदावर कार्यरत राहतील, असेही ग्रामविकास खात्याने स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा २० सप्टेंबर २०१९ तर, पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ हा १४ सप्टेंबरलाच संपुष्टात आलेला आहे. परंतु राज्य सरकारने या पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीच्या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चार महिने निवडणूक घेता येणार नसल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार येत्या २० डिसेंबरला ही चार महिन्यांची मुदतवाढ संपुष्टात येत आहे. त्यानंतरच पंचायत समिती सभापतींच्या निवडी करता येणार असल्याचेही लिटे यांनी स्पष्ट केले आहे.
सभापती आरक्षण सोडत लवकरच
पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत काढण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपापल्या सोईनुसार येत्या आठवडाभरात या सोडती काढू शकणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सभापतींची आरक्षण सोडत येत्या चार दिवसांत काढली जाणार असल्याचे सोमवारी (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
- 1 of 1029
- ››