agri agricultural marathi news panchayt committee chairman will select after December 20 mumbai maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यातील पंचायत समिती सभापतींच्या निवडी २० नंतरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

पुणे  : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या शुक्रवारनंतरच (ता. २०) होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता. ९) सांगितले. 

पुणे  : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या शुक्रवारनंतरच (ता. २०) होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता. ९) सांगितले. 

पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडीबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. शिवाय, नियोजित कार्यक्रमानुसार येत्या शुक्रवारी (ता. १३) सभापतींच्या निवडी केल्या जाणार नाहीत. परिणामी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना आपोआपच आणखी एक आठवड्याची मुदतवाढ मिळणार आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच पदावर कार्यरत राहतील, असेही ग्रामविकास खात्याने स्पष्ट केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा २० सप्टेंबर २०१९ तर, पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ हा १४ सप्टेंबरलाच संपुष्टात आलेला आहे. परंतु राज्य सरकारने या पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीच्या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चार महिने निवडणूक घेता येणार नसल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार येत्या २० डिसेंबरला ही चार महिन्यांची मुदतवाढ संपुष्टात येत आहे. त्यानंतरच पंचायत समिती सभापतींच्या निवडी करता येणार असल्याचेही लिटे यांनी स्पष्ट केले आहे.

सभापती आरक्षण सोडत लवकरच
पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठीची सोडत काढण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपापल्या सोईनुसार येत्या आठवडाभरात या सोडती काढू शकणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सभापतींची आरक्षण सोडत येत्या चार दिवसांत काढली जाणार असल्याचे सोमवारी (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...