Agri agricultural Marathi News pankaja munde may declare decision beed maharashtra | Agrowon

पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान मेळाव्याकडे लक्ष

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी पंकजा मुंडे यांनी, आज (ता. १२) स्वाभिमान दिवस असून, आपण सर्वांनी यावे, असे आवाहन केले आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी पंकजा मुंडे यांनी, आज (ता. १२) स्वाभिमान दिवस असून, आपण सर्वांनी यावे, असे आवाहन केले आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट आणि परळी भागात लागलेल्या बॅनरवर कुठेही भाजपचे चिन्ह वा बड्या नेत्यांचे फोटो नसल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत. मेळाव्याची जय्यत तयारी असली तरी मेळाव्याला कोण नेते उपस्थित राहणार? याबाबत बुधवारी उशिरापर्यंत नावे समोर आली नव्हती. त्यातच पंकजा मुंडे यांनी मागील दोन दिवस मुंबई व औरंगाबाद येथे झालेल्या पक्षाच्या बैठकांकडे पाठ फिरविल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.  दरम्यान, गुरुवारी (ता. १२) परळीजवळील गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य शिबीर देखील होणार आहे.

एकीकडे पंकजा मुंडेंनी ‘‘हा स्वाभिमान दिवस आहे’’ त्यामुळे ‘‘तुम्ही सर्व या’’, असे आवाहन समर्थकांना केले आहे. तर दुसरीकडे पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबाद येथील नियोजित स्मारकासाठी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट या दोन गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. त्यात आमच्या सरकारच्या काळात स्मारक मार्गी लागले नसल्याची खंत खडसे यांनी व्यक्त करून उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षाही बरेच काही सांगून जातात. त्यामुळे पंकजा मुंडे यांची भूमिका काय? याकडे लक्ष लागले आहे.  


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...