महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली ः जिल्हाधिकारी मोडक

महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली
महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली

वाशीम : पूर्वी उद्योग व्यवसाय सुरू करणे किंवा उभारणे ही कामे पुरुषच करीत होते. मात्र आता महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय सुरू करून त्या सक्षम होत आहेत. त्यामुळे उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी महिलांनी मोडीत काढली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. शुक्रवारी (ता. २९) कारंजा येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक पुरुस्कृत आणि महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारा मार्गदर्शित महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीच्या रुरल मार्टचे उद्‍घाटन जिल्हाधिकारी मोडक यांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे मुख्य महाप्रबंधक यू. डी. शिरसाळकर, दत्तात्रय निनावकर, केशव पवार, विवेक खडसे, विजय खंडरे, शरद वाळके, राजेश नागपुरे आदी अधिकारीवर्ग उपस्थित होता. या वेळी श्री. मोडक म्हणाले, बचत गटांचे कर्जफेडीचे प्रमाण जास्त असून विशेषत: महिला बचत गटांचे कर्ज फेडीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. त्यांना मिळालेले योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे आज महिला उद्योग व्यवसायात पुरुषांच्या पुढे आहेत. रुरल मार्टच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळाली आहे. नाबार्डने दोन वर्षासाठी रुरल मार्टला आधार दिला आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी फीत कापून रुरल मार्टचे उद्‍घाटन केले. या वेळी श्री. मोडक व श्री. शिरसालकर यांनी बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वाहणे यांनी केले. राजेश नागपुरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com