Agri Business News agri input shops remain close Pune Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा केंद्रे बंदच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू केले असले तरी जीवनाश्यक वस्तू म्हणून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणची कृषी सेवा केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे.

पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात १४४ कलम लागू केले असले तरी जीवनाश्यक वस्तू म्हणून जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना निविष्ठा विक्री करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणची कृषी सेवा केंद्रे बंद असल्याचे चित्र आहे.
 

लवकरच खरीप हंगाम सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना पुर्वतयारीच्या अनुषंगाने बियाणे व खते उपलब्ध होणे गरजेचे आहे. बियाणे व खते जीवनाश्यक वस्तु अधिनियम १९५५ अंतर्गत समाविष्ठ असल्याने त्यांची दुकाने पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर काही कालमर्यादेसाठी सुरु ठेवणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील कृषी सेवा केंद्र सुरु ठेवण्याच्या सुचनाही दिल्या आहेत.

सध्या ग्रामीण भागात ‘कोरोना’मुळे भितीचे वातावरण तयार झाल्याने आणि ग्राहकांची काळजी लक्षात घेऊन अनेक कृषी सेवा केंद्र चालकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही दुकाने सुरु ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेश निर्गमित केले आहे. मात्र, असे असतानाही अनेक गावांमधील कृषी सेवा केंद्रे बंद असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी मजूर वर्ग नसल्याने विक्री कशी करायची असा प्रश्न केंद्र चालक उपस्थित करीत आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली जात आहेत. मात्र, बागायती भागात ग्राहक व कामगार उपलब्ध असल्याने काही सेवा केंद्र चालकांनी दुकाने सुरू ठेवली असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र फर्टिलायझर सिड्स ॲण्ड पेस्टिसाईटस डिलर्स असोसिएशनचे पुणे जिल्हा सहसचिव महेश मोरे म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही सुरूवातीला पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी झालो होतो. परंतु मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यातच कृषी आयुक्तालयाकडून एक परिपत्रक काढले आहे. त्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हयातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार आम्ही कृषी सेवा केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, काही ठिकाणी केंद्रातील कामगार गावी गेले असून काही ठिकाणी स्थानिक प्रशासन व नागरिकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बंद ठेवत आहे. परंतु काही गावांमध्ये आठवड्यातून दोन ते तीन दिवस तर, काही ठिकाणी तीन ते चार तास सेवा केंद्र नियमाचे पालन करून सुरु ठेवले जात आहेत. येथे शेतकऱ्यांनी गरजेनुसार निविष्ठा खरेदी कराव्यात.

निविष्ठा विक्री करताना खालील सुचनाचे पालन करावे

  • विक्री केंद्रामध्ये कोणत्याही परिस्थितीत चारपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्यात यावे.
  • विक्री केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्यांना तोंडाला मास्क किवा रूमाल बांधण्यासाठी प्रवृत्त करावे.
  • विक्री केंद्रात साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी.
  •  विक्री केंद्रात नियमित निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोबाईल क्रमांकासह नोंद ठेवण्यात यावी.
  • स्थानिक प्रशासनाकडील नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • निविष्ठांची जादा दराने विक्री करू नये, अन्यथा निविष्ठा कायद्याअंतर्गत कारवाई होईल याची नोंद घ्यावी.
  • विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची सक्ती करू नये.

इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...