Agri Business News Amul pays two hundred crores to farmers in rescission Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २०० कोटींचे पेमेंट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट अवस्थेतून वाटचाल करीत असताना `अमूल`ची घोडदौड मात्र भुवया उंचावणारी ठरते आहे. अमूलच्या पारदर्शक नियोजनामुळे मंदीत देखील शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात दरमहा २०० कोटीचे पेमेंट जात आहे. 

पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट अवस्थेतून वाटचाल करीत असताना `अमूल`ची घोडदौड मात्र भुवया उंचावणारी ठरते आहे. अमूलच्या पारदर्शक नियोजनामुळे मंदीत देखील शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यात दरमहा २०० कोटीचे पेमेंट जात आहे. 

‘‘लॉकडाऊनमुळे दुधाला मागणी नसल्याचे सांगून राज्यातील संकलकांनी शेतकऱ्यांच्या दुधाचे खरेदी दर १८ ते २२ रुपयांपर्यंत खाली आणले आहेत. मात्र, `अमूल`कडून २५ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आजही गायीच्या दुधाला प्रतिलिटर २८ ते २९ रुपये तर म्हशीच्या दुधाला ४० ते ४२ रुपये दर दिला जातो आहे. मंदी सांगितली जात असली तरी ‘अमूल’कडून १७ लाख लीटर दुधाची खरेदी सुरळीतपणे चालू आहे,’’ अशी माहिती अमूलच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

अमूल हा शेतकऱ्यांनी उभारलेल्या दूध संघांचा ब्रॅंड असला तरी महाराष्ट्रात अमूलला सापत्नभावाची वागणूक शासन दरबारी मिळत असते, असे अमूलच्या कर्मचाऱ्यांना वाटते. राज्यात गेल्या वर्षी दुधाचे भाव घसरल्यानंतर पाच रुपये अनुदानाची योजना राबविली गेली. मात्र, अनुदान योजनेपासून अमूलच्या सभासद शेतकऱ्यांना दूर ठेवले गेले. त्यामुळे दीड लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. त्या स्थितीतही अमूलकडून प्रतिलीटर २४ रुपये दर शेतकऱ्यांना दिला जात होता. अनुदान दिले असते तर २९ रुपये दर मिळाला असता, असे कर्मचारी सांगतात. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या चांगल्या दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी अमूलने सध्या ११०० दूध संकलन केंद्रे उभारली आहेत. दीड लाख शेतकऱ्यांचे दूध जमा करण्यासाठी मुंबईत सहा तर पुणे, औरंगाबाद व नागपूरला प्रत्येकी एक असे ९ प्रकल्प उभारले आहेत. त्यामुळे संकलित केलेले १६ ते १७ लाख लीटर दूध पुन्हा पिशवीबंद करून राज्यामध्येच विकण्याचे तंत्र ‘अमुल’ने ठेवले आहे.

‘‘राज्यातील खासगी व सहकारी दूध प्रकल्पांबरोबर आमची स्पर्धा नाही. उलट त्यांचे दूध गुणवत्तापूर्ण असल्यास आम्ही स्वीकारतो. गुणवत्ता नसल्यास नाकारतो देखील. आम्ही फक्त शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवत असून आमची स्पर्धा आमच्याशीच आहे,’’ असे अधिकारी अभिमानाने सांगतात. 

दरम्यान, गुजरातमधील १८ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकारी दूधसंघांचा समूह असलेला अमूलने आर्थिक वर्षाच्या शेवटी ३८ हजार ५०० कोटी रुपयांची उलाढाल देशपातळीवर केली आहे. मंदीच्या काळातही १७ टक्के उलाढाल वाढल्यामुळे अमूलची महाराष्ट्रातील टीम देखील सध्या खूश आहे. अमूलने आता २०२०-२१ या नव्या आर्थिक वर्षासाठी ४६ हजार कोटीचा व्यवसाय करण्याचे ठरविले आहे. अमूलचे नेतृत्व करणारे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या संदेशात अमूलने आता कोरोनाच्या संकटावर मात करून शेतकऱ्यांसाठी अजून चांगली वाटचाल करण्याचा निर्धार केल्याचे नमुद केले आहे. 
 
शेतकरी पेमेंटच्या तारखा चुकत नाहीत
राज्याच्या दुग्ध व्यवसायात शेतकऱ्याला पारदर्शकता आणि गुणवत्ता अशा दोन्ही पातळ्यांवर अमूलने मोठा आधार दिला आहे. आमचे यश दाबून ठेवण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र, शेतकरी वर्गाचा पाठिंबा वाढतो आहे. त्यामुळेच १ ते १० तारखेला संकलित केलेल्या दुधाचे पेमेंट न चुकता १३ ते १५ तारखेला, ११ ते २० तारखेचे संकलनाचे पेमेंट २३ ते २५ तारखेला आणि २१ ते ३० तारखेचे पेमेंट ३ ते ५ तारखेला थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात होते. पेमेंटमध्ये कधीही खंड नाही, छुपी कपात नाही किंवा दुधाचे दर पाडण्याचे तंत्रही अवलंबिले जात नाही. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आधारस्तंभ म्हणून अमूल काम करेल,  असा विश्वास अमूलच्या सूत्रांनी व्यक्त केला.
 


इतर अॅग्रो विशेष
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...