Agri Business News ban for Ledbase Fishing Mumbai Maharashtra | Agrowon

एलईडीच्या मदतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर बंदी : मंत्री अस्लम शेख

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

मुंबई  : समुद्रात एलईडीच्या मदतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा मस्त्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली. यापुढे एलईडीने मासेमारी करताना आढळून आल्यास अशा बोटींना जबर दंड आकारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मच्छिमारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात शुक्रवारी (ता. १४) बैठक घेतली. बैठकीला मत्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसह अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

मुंबई  : समुद्रात एलईडीच्या मदतीने केल्या जाणाऱ्या मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा मस्त्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली. यापुढे एलईडीने मासेमारी करताना आढळून आल्यास अशा बोटींना जबर दंड आकारण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

मच्छिमारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मंत्री अस्लम शेख यांनी मंत्रालयात शुक्रवारी (ता. १४) बैठक घेतली. बैठकीला मत्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसह अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.

मंत्री शेख म्हणाले, की एका परवान्यावर अनेक बोटी मासेमारी करतात. हे रोखण्यासाठी यापुढे बोटींना जीपीएस (ग्राऊंड पोझिशन सिस्टीम) बसविण्यात येईल. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसेल. तसेच अवैध मासेमारी रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एलईडीच्या मदतीने मासेमारी करताना जप्त केलेली बोट ज्या मच्छीमार संस्थेची असेल त्या संस्थेच्या सर्व शासकीय सवलती रद्द करण्यात येतील. पारंपरिक मासेमारीला चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडीच्या सहाय्याने होणारी मासेमारी रोखण्यासाठी सागरी पोलीस, तटरक्षक दल, मत्स्य विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निर्देश याआधीच देण्यात आले आहेत. बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी मालकांनी बोटींवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असे आवाहन त्यांनी केले.

अवैध मासेमारीच्या विरोधात कारवाई करण्याचे अधिकार पोलीस आणि महसूल प्रशासनाला असून हे अधिकार मत्स्य विभागाकडे घेण्यात येतील. पर्ससीन जाळीमुळे पारंपरिक मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. सोमवंशी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी लवकरच समिती नेमली जाईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी दिली.
 
‘अपघात विम्यापोटी दिली जाणारी मदत वाढविणार’
मासेमारी करताना मच्छीमाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अपघात विम्यापोटी एक लाख रुपयांची मदत दिली जाते. या मदतीत चार लाख रुपयांची वाढ करून ती पाच लाख रूपये करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री शेख यांनी या वेळी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरतीअकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात केळी...नांदेड : लॅाकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे....
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
आंब्याची वाहतूक, वितरण व्यवस्थेतील...मुंबई : एप्रिलपासून आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे...
कोल्हापुरात वाहतुक बंदीचा रेशीम कोषाला...कोल्हापूर : वाहतूक बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे...
मुख्यमंत्री साहायता निधीसाठी ‘कृषी’च्या...नाशिक: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
खानदेशात कडब्याच्या दरांवर दबाव जळगाव : खानदेशातून परराज्यासह इतर जिल्ह्यांत कडबा...
मदत व पुनर्वसन मंत्री देणार ४० हजार...चंद्रपूर ः खऱ्या अर्थाने पालकत्वाची जबाबदारी पार...
खानदेशात धान्याची शिवार खरेदी, मार्केट...जळगाव : खानदेशात धान्याची शिवार खरेदी बंद आहे....
भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नंदुरबार जिल्ह्यात पपईची कवडीमोल दराने...नंदुरबार : लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य...
जळगाव जिल्ह्यातील बॅंका पीक कर्ज...जळगाव : जिल्ह्यात अपवाद वगळता बॅंकांनी नव्याने...
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...