चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून होणार सुरू

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक बाजार बंद होते. मात्र, आता हे बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी बाजारसमित्या पुढे येऊ लागल्या आहेत. खेड बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारात शनिवारपासून (ता.३०) जनावरांचा बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र

चाकण येथील जनावरांचा बाजार ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद होता. मात्र, खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी हा बाजार सुरु करण्याच्या लेखी सूचना पणन संचालक सुनील पवार व जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या जनावरांच्या बाजारात शेळ्या, मेंढ्या, बैल, गाय, म्हैस आदी जनावरांची खरेदी विक्री होणार आहे.

गर्दी टाळून आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून हा बाजार भरणार आहे. खेड बाजार समितीच्या चाकण व राजगुरूनगर उपबाजार आवारात काही दिवसांचा अपवाद वगळता लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला तरकारी तसेच कांदा-बटाटा हे व्यापार सुरू ठेवण्यात आले असल्याचे सभापती घुमटकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com