Agri Business News Chakan livestock market will start from Saturday Pune Maharashtra | Page 2 ||| Agrowon

चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून होणार सुरू

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 मे 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक बाजार बंद होते. मात्र, आता हे बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी बाजारसमित्या पुढे येऊ लागल्या आहेत. खेड बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारात शनिवारपासून (ता.३०) जनावरांचा बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे पुणे जिल्ह्यातील अनेक बाजार बंद होते. मात्र, आता हे बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी बाजारसमित्या पुढे येऊ लागल्या आहेत. खेड बाजार समितीच्या चाकण उपबाजार आवारात शनिवारपासून (ता.३०) जनावरांचा बाजार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

चाकण येथील जनावरांचा बाजार ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून बंद होता. मात्र, खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी हा बाजार सुरु करण्याच्या लेखी सूचना पणन संचालक सुनील पवार व जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक कुंभार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार या जनावरांच्या बाजारात शेळ्या, मेंढ्या, बैल, गाय, म्हैस आदी जनावरांची खरेदी विक्री होणार आहे.

गर्दी टाळून आणि फिजिकल डिस्टन्स ठेवून हा बाजार भरणार आहे. खेड बाजार समितीच्या चाकण व राजगुरूनगर उपबाजार आवारात काही दिवसांचा अपवाद वगळता लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला तरकारी तसेच कांदा-बटाटा हे व्यापार सुरू ठेवण्यात आले असल्याचे सभापती घुमटकर यांनी सांगितले.


इतर बातम्या
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात २६ टक्के पीककर्ज वितरणऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यात बंद...औरंगाबाद: कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या...
राज्यात पावसाला पोषक हवामानपुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने...
कृषी आयुक्त दिवसेंची बदली, गायकवाड...मुंबई : राज्य सरकारने शनिवारी महत्त्वपूर्ण...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....