Agri Business News China exports are not affected by the dispute Pune Maharashtra | Agrowon

शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाही

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 जुलै 2020

पुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची निर्यात आधीपासूनच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारत-चीन व्यापारी कोंडीचा परिणाम राज्यातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची निर्यात आधीपासूनच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारत-चीन व्यापारी कोंडीचा परिणाम राज्यातून होणाऱ्या शेतीमाल निर्यातीवर होणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

कृषी विभागाच्या निर्यात कक्षाचे सल्लागार डॉ.गोविंद हांडे म्हणाले, की २०१७ मध्ये राज्यातून अवघा ७० कोटी रुपयांचा शेतीमाल चीनला पाठविला गेला. त्यानंतर २०१८ मध्ये निर्यात ४० टक्क्यांनी वाढून १०६ कोटींपर्यंत गेली. मात्र, गेल्या वर्षी निर्यात पुन्हा घसरून ५९ कोटींवर आली. सध्याची ही निर्यात अत्यल्प आहे. त्यामुळे चालू स्थितीत चीनने काही बंधने टाकली तरी राज्याच्या शेतमाल निर्यातीवर परिणाम होणार नाही.

भारतीय भुईमूग, गवारगम, कडधान्ये, फळांचा रस, आंब्याचा पल्प असा निवडक शेतमाल चीनला निर्यात होतो. राज्यातून साखर, द्राक्षे, आंबा तसेच इतर फळांची निर्यात चीनला होण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तथापि, युरोपप्रमाणे चीनच्या बाजारपेठेत महाराष्ट्रातील निर्यातदारांचा जम बसलेला नाही.“चीनला देशाच्या निर्यातीपैकी वरील वस्तूंचे निर्यातमुल्य पाहिल्यास ती ०.०८ टक्के इतकी नगण्य आहे. 

महाराष्ट्रातून जगभर गेलेल्या झालेल्या एकूण निर्यातीपैकी फक्त ०.२७ टक्के मूल्याचा माल गेल्या वर्षी गेला आहे. त्यामुळे राज्याच्या शेतीमालातील निर्यातीला आर्थिक आघाडीवर मोठा फटका बसण्याची शक्यता वाटत नाही,” असे डॉ. गोविंद हांडे यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया 
भारतीय शेतीमाल मोठ्या प्रमाणात चीनला जात नाही. मात्र, काही उत्पादनांसाठी चीन ही नवी व महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयाला येत आहे. तेथे अलीकडेच ४००-५०० कंटेनर द्राक्षे जात होती. द्राक्षांसाठी हीच बाजारपेठ पुढे वाढणार आहे. सध्या द्राक्षे, कापूस, धागे, सोयाबीन पेंडची निर्यात चीनला केली जाते. त्यामुळे भारत-चीनमध्ये व्यापारी युद्ध वाढले तर या निवडक कृषिमालाच्या निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनी.
 

 भारतातून चीनला झालेली निर्यात
वर्ष  शेतमाल टन एकूण मूल्य(कोटीत)
२०१७-१८ ५५८०८ ४६४ 
२०१८-१९  १०४२९० ९२३
२०१९-२०   ९८५१४ ८४२ 
 महाराष्ट्रातून चीनला झालेली निर्यात
वर्ष  शेतमाल टनात एकूण मूल्य (कोटीत)
२०१७-१८ ९७९९ ७०
२०१८-१९   १५४७६ १०६
२०१९-२०   ६७५९  ५९

 


इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...