Agri Business News commodity rates in market committee pune mahrashtra | Agrowon

महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी, कवठांची आवक

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. मध्य प्रदेशातून मटारची आवक निम्‍म्याने घटल्याने दरात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात मटारची सुमारे १० ट्रक आवक झाली होती. ती रविवारी ५ ट्रक झाली. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. महाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती.

पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. १६) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. मध्य प्रदेशातून मटारची आवक निम्‍म्याने घटल्याने दरात वाढ झाली होती. गेल्या आठवड्यात मटारची सुमारे १० ट्रक आवक झाली होती. ती रविवारी ५ ट्रक झाली. इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. महाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरचीची सुमारे १५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवग्याची सुमारे ५ टेम्पो, कर्नाटकातून घेवड्याची ३ टेम्पो, राजस्थानातून १० ट्रक गाजराची, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबीची सुमारे ५ ट्रक, मध्य प्रदेशातून मटाराची सुमारे ५ ट्रक, तर लसणाची सुमारे ६ हजार गोणी, गुजरात, इंदूर आणि स्थानिक भागातून  बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली होती.  

स्थानिक आवकेमध्ये सातारी आल्याची सुमारे ८०० पोती, टोमॅटोची सुमारे ६ हजार क्रेट, भेंडी, काकडी, फ्लॉवर, सिमला मिरची आणि तांबड्या भोपळ्याची प्रत्येकी सुमारे ८ ते १० टेम्पो, गवारीची ७ टेम्पो, कोबीची ८ टेम्पो, हिरव्या मिरचीची ५ टेम्पो, शेवग्याची ४ टेम्पो, कांद्याची सुमारे २०० ट्रक आवक झाली होती. महाशिवरात्रीनिमित्त कराड आणि करमाळा परिसरातून रताळ्याची सुमारे ५०० गोणी आवक झाली होती.  

फळभाज्यांचे दर (प्रति दहा किलो) : कांदा : १८०-२२०, बटाटा : १००-१७०, लसूण : ८००-१२००, आले : सातारी २००-४००, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान - सुरती ४००-५००, टोमॅटो : ४०-६०, दोडका : १८०-२२०, हिरवी मिरची : २००-३००, दुधी भोपळा : ५०-१००, चवळी : २००-२२०, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी : १००-१२०, पापडी : १२०-१४०, पडवळ : १४०-१५०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : २०-५०, वांगी : १००-२००, डिंगरी : १५०-१६०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ३५०-४००, गाजर : १३०-१६०, वालवर : १४०-१५०, बीट : ४०-६०, घेवडा : ८०-१००, कोहळा : १००-१५०, आर्वी: ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : २००-२५०, पावटा : २००-२२०, भुईमूग शेंग : ६५०, मटार : परराज्य ३५०-३८०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००. रताळी ः कराड - १८०-२००, करमाळा - १२०-१४०. 
 
फळबाजार 
रविवारी (ता.१६) येथील बाजारात मोसंबीची ५० टन, संत्रीची सुमारे ६० टन, डाळिंबाची १५० टन, पपईची १५ टेम्पो, लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, कलिंगडाची २५ टेम्पो, खरबुजाची ६ टेम्पो, विविध जातींच्या बोरांची सुमारे २०० गोणी, द्राक्षांची सुमारे ३० टन, पेरूची २ हजार क्रेट, चिकूची ३ हजार डाग, स्ट्रॉबेरीची सुमारे ६ टन आवक झाली होती. 

फळांचे दर : लिंबे (प्रति गोणी) : १५०-३००, मोसंबी : (३ डझन) : १००-२२०, (४ डझन ) : ३०-८०, संत्रा : (३ डझन) : १२०-३००, (४ डझन ) : ४०-१३०, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ३५-१४०, गणेश : १०-३५, आरक्ता २५-६५. कलिंगड : ५-१२, खरबूज : १०-२५, पपई : ५-२०, सफरचंद : काश्मीर डेलिशिअस (१५ ते १६ किलो) ९००-१४००, किन्नोर -(२५-३०) - २२००-२५००, सिमला (२५) -१८००-२०००, बोरे (१० किलो) : चेकनट : ६००-६५०, उमराण : ३०-३५, चमेली : १२०-२२०, चण्यामण्या : ३५०-४००. स्‍ट्रॉबेरी (२ किलो) - ७०-१२०, द्राक्षे - सोनका (१५ किलो) - ७००-१४००, जम्बो - ८००-१३००, तास-ए-गणेश - ६००-९००, माणिक चमण - ५००-७००. 
 
पालेभाज्या
 
पालेभाज्यांमध्ये रविवारी (ता.१६) कोथिंबिरीची सुमारे पावणेदोन लाख, मेथीची सुमारे ८० हजार जुड्यांची आवक झाली होती.  पालेभाज्यांचे दर (शेकडा, जुडी) : कोथिंबीर : ४००-१०००, मेथी : ३००-६००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५०० -८००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-५००, पुदिना : १००-२००, अंबाडी : ५००-८००, मुळा : ५००- १०००, राजगिरा : ४००-५००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-७००, पालक : ४००-६००. हरभरा गड्डी -४००-६००. 
 
फुले
फुलांचे दर (प्रतिकिलो) : झेंडू : १०-३०, गुलछडी : ८०-१५०, कापरी : १०-२०, शेवंती : ८०-१३०, अ‍ॅस्टर : ८-१२, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-१००, डच गुलाब (२० नग) : २०-१६०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : ३०-६०, कार्नेशियन : १२०-२००.
 
मटण मासळी 
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. १६) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ७ टन, खाडीतील मासळीची सुमारे ७०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे दीड टन आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली असल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. कोरोना विषाणूच्या चिकनसंदर्भातील अफवांचा कोणताही संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर बाजारात चिकन, अंडीला मागणी वाढली आहे. परिणामी, गेल्या आठवड्यात घसलेल्या अंडी दरात दोन दिवसांत शेकड्यामागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली. चिकन, मटणाचे भाव मात्र स्थिर होते अशी माहिती चिकनचे व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे १५००-१६००, मध्यम : १०००, लहान ७५०, भिला :  ६००, हलवा : ५५०, सुरमई : ५५०-६००, रावस : लहान - ६५०-७००,  मोठा : ८००, घोळ : ८००, भिंग : ४००, करली : २८०-३२०, करंदी : ४००, पाला : लहान ६०० मोठे : १२००, वाम :  पिवळी लहान ७००, मोठी ८००-९००, काळी : ३६०-४००, ओले बोंबील : १८०.

कोळंबी :लहान ४००, मोठे : ४८०, जंबो प्रॉन्स : १५००, किंग प्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १५००, मोरी : ३६०, मांदेली : १२०-१४०, राणीमासा : १८०-२०० खेकडे : २००-२८०, चिंबोऱ्या : ५५० 

खाडीची मासळी
सौंदाळे : ३२०, खापी : ३२०, नगली : ४८०, तांबोशी : ४८०, पालू : २८०, लेपा : २४०, शेवटे : २००-२८०, बांगडा : लहान २४० , मोठा २८०-३२०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-१८०, तिसर्‍या : १६०, खुबे : १६०, तारली : १६०-२००. 

नदीची मासळी
रहू : १४०, कतला : १६०, मरळ : ४००, शिवडा : २८०, खवली : २८०, आम्ळी : १६०, खेकडे : २४० वाम : ६००. 
 

चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २३०. 
 

अंडी : गावरान : शेकडा : ६५०, डझन : ९०, प्रति नग : ७.५, इंग्लिश : शेकडा : ४५५ डझन : ६० प्रतिनग : ५. 
 

मटण : बोकडाचे : ५८०, बोल्हाईचे : ५८०, खिमा : ५८०, कलेजी : ६४०.
 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...