Agri Business News crop loan distribution status hingoli Maharashtra | Agrowon

हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध बॅंकांनी शुक्रवारपर्यंत (ता.२९) १७ हजार ८०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी १६ लाख ७० हजार रुपये (५.०६ टक्के) पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध बॅंकांनी शुक्रवारपर्यंत (ता.२९) १७ हजार ८०५ शेतकऱ्यांना ५९ कोटी १६ लाख ७० हजार रुपये (५.०६ टक्के) पीककर्ज वाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यातील विविध बॅंकांना १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत. त्यात व्यापारी बॅंकांना ८५९ कोटी १० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला १६० कोटी ९६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १४८ कोटी ८९ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

सद्यःस्थितीत जिल्हा बॅंकेने पीककर्ज वाटपात आघाडी घेतली असून आजवर १६ हजार ३११ शेतकऱ्यांना ४० कोटी ९१ लाख ३ हजार रुपये पीककर्ज वाटप केले आहे. व्यापारी बॅंकांना सर्वाधिक उद्दिष्ट असले तरी तूर्त या बॅंकांनी केवळ ७९९ शेतकऱ्यांना १३ कोटी २४ लाख ९ हजार रुपयेच पीककर्ज वाटप केले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ६९५ शेतकऱ्यांना ५ कोटी १ लाख ५८ हजार रुपये पीककर्ज वाटप केले आहे. पेरणी जवळ येऊन ठेपलेली असताना अनेक कारणे सांगत बॅंका कर्ज देण्यास विलंब लावत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी अडचणी येत आहेत. पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

बॅंकनिहाय पीककर्ज वाटप (कोटी रुपये)
बॅंक कर्जवाटप शेतकरी संख्या टक्केवारी
व्यापारी बॅंका १३.२४ ७९९ १.५४
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ५.०१ ६९५ ३.१२
जिल्हा बॅंक ४०.९१ १६,३११ २७.४८

 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...