Agri Business News crop loan distribution status review meeting Buldhana Maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत पीककर्ज वाटप पूर्ण करा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

बुलडाणा  :  बँकांनी पात्र शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत त्यांच्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. शेतकरी शेतीची पूर्वमशागत करून खरीप पेरणीसाठी सज्ज झाले आहेत. कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. हे लक्षात घेत बँकांनी पात्र शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत त्यांच्या उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पूर्ण करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित पीककर्ज वितरण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले, की महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीककर्ज वितरण करावे. कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. तसेच कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याबाबत याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीककर्ज वितरण करावे. पीककर्ज वितरण करताना ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग, मास्क किंवा रुमाल तोंडावर असणे, सॅनिटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुकास्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घ्यावेत, पीक कर्ज कागदपत्रे आदींबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सहज होईल अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
 
 २२,६१० शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

बैठकीत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पीककर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. यानुसार ३० मेपर्यंत २२ हजार ६१० शेतकऱ्यांना १७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. या हंगामात जिल्ह्यातील तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना २२६० कोटी रुपये कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : बाजार समितीत या सप्ताहात कोथिंबीरीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची मागणी,...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायमनागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार...
पुणे शहरालगतच्या रुग्णालयांमधील ८०...पुणे  : शहरालगतच्या गावांमध्ये कोरोनाबाधित...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...
शेळ्या, मेंढ्यांचे बाजार सुरु करण्याची...नगर  ः सध्या आषाढ महिना सुरु असून या...
गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...भंडारा   : गोसेखुर्द प्रकल्प २०२३...
खासगी दूध संघांनी दुधाला २५ रुपये दर...नगर ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादन अडचणीत...
नांदेड जिल्ह्यात ९२ टक्के क्षेत्रावर...नांदेड ः यावर्षीच्या (२०२०) खरीप हंगामात नांदेड...
नगर जिल्ह्यात युरियाची टंचाई कायम नगर  ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना...
नगर जिल्ह्यात युरिया टंचाई कायमनगर ः खरीप पिके जोमात असून आता पिकांना युरिया...
पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख...पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक...
आमगाव खडकी गावाने सहायता निधीला मदत देत...वर्धा  ः गावातील मार्गावरुन जाणाऱ्या...
लासलगाव बाजार समितीत आजपासून शेतमालाचे...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात...
औरंगाबादेत २४ लाख क्विंटल कापूस खरेदीऔरंगाबाद : जिल्ह्यात कापूस पणन महासंघ (सीसीआय),...
नांदेड, परभणी, हिंगोलीत हरभऱ्याची...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
गुजरातमधील अवैध एचटीबीटी उत्पादनाला...नागपूर ः बीटी नंतर एचटीबीटी (तणनाशक सहनशील)...
खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर ...नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळीकोल्हापूर : दिल्ली सरकारने शंभर युनिटपर्यंतचे वीज...
पुणे विभागात खरिपाची सात लाख ३४ हजार...पुणे   ः जूनच्या सुरूवातील पुणे...