Agri Business News demand increase for indigenous chicken Nagar Maharashtra | Agrowon

राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली 

सूर्यकांत नेटके
रविवार, 31 मे 2020

देशी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अलिकडच्या काळात वाढत असल्याचे मागील व या महिन्यात पिलांच्या मागणीतून स्पष्ट होत आहे. कामगार स्थलांतरीत झाल्याने देशी पिले उत्पादनाला राज्यभर अडचणी येत आहेत. मात्र मागणी अधिक असल्याने दिड, दोन महिन्यांचे आगाऊ बुकींग केले जात आहे. ‘कोरोना’च्या काळातही पिले व देशी कोंबड्यांनी मागणी कायम होती. ’’ 
- संतोष अकुंश कानडे, देशी कोंबडी पालक व पिले उत्पादक, आंतरवली, जि. नगर. 

नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत अफवा पसरल्याचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसला. मात्र या काळात देशी कोंबड्याना मागणी कायम राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिनाभरात नव्यानेही देशी कोंबडी पिलांना मोठी मागणी होत असून उत्पादकांकडे साधारण दिड ते दोन महिन्यांचे आगाऊ बुकींगही होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यात कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर चिकन खाल्ल्याने कोरोना होतो या अफवेमुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका सोसावा लागला. अनेक उत्पादकांना ब्रॉयलर कोंबड्या, अंडी, पिले नष्ट करावी लागली. मात्र चिकनबाबत ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चिकनला मागणी वाढली. मात्र तोपर्यत बऱ्यापैकी कोंबड्या नष्ट झाल्या होत्या. शिवाय नव्यानेही पिले संभाळण्यासाठी टाकली नव्हती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने ब्रॉयलर चिकनच्या ठोक दरात ४० ते ५० तर किरकोळ विक्रच्या दरात ७० ते ९० रुपयांनी वाढ झाली आहे. 

मात्र या कालावधीत देशी कोंबड्यांनी मागणी कायम राहिली आहे. तरीही देशी कुक्कुट उत्पादकांनीही मागील महिन्यात नव्याने पिले संगोपनासाठी टाकली नाहीत. मात्र लोकांची देशी कोंबड्यांना मागणी असल्याने देशी पिलांनाही उत्पादकांकडून मागणी वाढली आहे. राज्यातील बहूतांश भागात देशी कुक्कुटपालन केले जात असले तरी प्रामुख्याने नगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, यवतमाळ, चंद्रपुर, अमरावती, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. देशी पिलांना मागणी वाढत असताना कामगार नसल्याने उत्पादनाला मात्र अडचणी येत आहेत. मागणी वाढल्याने प्रती पिलांच्या दरातही चार ते पाच रुपयांनी वाढ झाल्याचे देशा कुक्कुटपालक सांगत आहेत. 
 
सर्वसाधारण राज्यातील देशी कोंबडीपालनाची स्थिती 

  •  राज्यात देशी कुक्कुट उत्पादक ः साधारण १ ते सव्वा लाख
  • देशी पिलांचे उत्पादन करणाऱ्या हॅचरीज ः साधारण ७० ते ८०  
  • राज्यात देशी कोंबडी पिलांचे उत्पादन ः साधारण २५ कोटी 
  • मागणी असलेल्या देशी कोंबडया ः चैतन्य, गिरिराज, ग्रामप्रिया, वनराज, आरटीआर, सातपुडा, कावेरी. 
  • सध्याचा किरकोळ दर ः २३० ते २५० रुपये किलो (जिवंत) 
  • दोन महिन्यांपूर्वीचा किरकोळ दर ः १६० ते १८० (जिवंत) 

 
 
 


इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...