Agri Business News demand to increase milk purchase price Nagar Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खाजगी दुध संघांनी दूधाला २५ रुपये दर देण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक अडचणीत येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी उध्वस्त होतील. जर ग्राहकांसाठीचा दुध विक्री दर कमी झालेला नाही, मग शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध का खरेदी करता, असा प्रश्न उपस्थित करीत खाजगी दुध संघांनी दुधाला किमान २५ रुपये दर द्यावा, अशी मागणी करीत संगमनेर, अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन मोहिम सुरु केली आहे. जर दरात बदल केला नाही तर आंदोलन करु, असा इशाराही कार्यकर्ते देत आहेत. 

नगर  ः दुधाला दर मिळत नसल्याने दुग्धोत्पादक अडचणीत येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतकरी उध्वस्त होतील. जर ग्राहकांसाठीचा दुध विक्री दर कमी झालेला नाही, मग शेतकऱ्यांकडून कमी दरात दूध का खरेदी करता, असा प्रश्न उपस्थित करीत खाजगी दुध संघांनी दुधाला किमान २५ रुपये दर द्यावा, अशी मागणी करीत संगमनेर, अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन मोहिम सुरु केली आहे. जर दरात बदल केला नाही तर आंदोलन करु, असा इशाराही कार्यकर्ते देत आहेत. 

नगर जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग होण्यास सुरुवात झाल्यापासून दुधाला मागणी नाही, असे सांगत खाजगी दुध संघांनी प्रती लिटरमागे दहा ते बारा रुपये दर कमी केले आहेत. मात्र सध्याच्या उत्पादन खर्चाचा विचार करता हे दर परवडणारे नाही. सद्यःस्थितीत जनावरे सांभाळणेही अवघड झाले आहे. दुधाला किमान २५ रुपये प्रतिलिटर दर देणे शासनाने बंधनकारक केले असताना खाजगी संघ नियम पाळत नाहीत. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे खाजगी संघांनी दुधाला किमान २५ रुपये लिटर दर द्यावा व मागील चार महिन्यांत कमी केलेल्या दराचा फरक द्यावा, अशी मागणी करीत किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय किसान सभेचे नेते सुरेश नवले, सुनील पुंडे, महेश नवले, किरण देशमुख, वैभव सावंत, सुरेश साबळे, अमित नवले, स्वप्नील नवले, अक्षय शेटे, नानासाहेब मेटगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन मोहिम सुरु केली असून खाजगी दुध संघांच्या दुध संकलन केंद्र चालकांना मागण्यांबाबत निवेदन दिले जात आहे. 

अजून एक रुपया दर केला कमी 
‘कोरोना’चा संसर्ग सुरु झाल्यापासून खाजगी दुध संघांनी दहा ते बारा रुपये प्रतिलिटरने दर कमी केले आहेत. ग्राहकांसाठी दुधाचा खरेदी दर कमी केला नसला तरी शेतकऱ्यांकडून मात्र मागणी नसल्याचे कारण पुढे करत दर कपात केली. दोन दिवसांपुर्वी काही संघांनी अजून प्रतिलिटर दुधामागे एक रुपया कमी केला असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. 


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...