Agri Business News few arrival of agriculture commodity in market committee Pune Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सुमारे दोन महिने बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याचा बाजार पूर्ण क्षमतेने सुरु केल्यानंतरही आवक तुरळकच आहे. शुक्रवारी (ता.५) भाजीपाल्याची २८४ वाहनांमधून अवघी सुमारे ६ हजार क्विंटल आवक झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार बाजार आवाराबाहेरच शेतीमाल खरेदी विक्री करत असल्याने बाजार समितीमध्ये आवक होत नसल्याचे वास्तव आहे. 

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे सुमारे दोन महिने बंद असलेल्या पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याचा बाजार पूर्ण क्षमतेने सुरु केल्यानंतरही आवक तुरळकच आहे. शुक्रवारी (ता.५) भाजीपाल्याची २८४ वाहनांमधून अवघी सुमारे ६ हजार क्विंटल आवक झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार बाजार आवाराबाहेरच शेतीमाल खरेदी विक्री करत असल्याने बाजार समितीमध्ये आवक होत नसल्याचे वास्तव आहे. 

‘कोरोना’ला घाबरून अडते आणि कामगार संघटनांनी प्रशासनावर दबाव आणत दोन महिने बाजार बंद ठेवला. परिणामी शेतकरी आणि खरेदीदारांनी बाजार आवारात लगत आणि उपनगरांमध्ये परस्पर खरेदी - विक्री सुरु केली. ही खरेदी-विक्री हमाली, तोलाई, अडतीशिवाय सुरु झाली. त्यामुळे दोन महिन्यांनी अडते आणि कामगार संघटनांच्या मागणीनंतर बाजार सुरु झाल्यावरही बाजारात आवक होत नसल्याचे चित्र सध्या आहे. बाजार सुरु करताना, गर्दी नियंत्रित करण्यासाठी चक्राकार पद्धतीने बाजार सुरु करण्यात आला.

मात्र दोन दिवसांत भाजीपाल्याची काहीच आवक होत नसल्याचे दिसल्यावर, अडते आणि हमाल संघटनांनी बाजार पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य केल्यानंतरही आवक होत नसल्याने अडते आणि हमाल हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अडते आणि कामगारांनी बाजार आवाराबाहेरील, उपनगरांमधील शेतकरी ते खरेदीदार होणारा थेट व्यापार बंद करण्याची मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली. मात्र आयुक्तांनी बाजार समित्यांची गरजच राहिली नसल्याचे सुनावले आणि शहरातील भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री बंद करण्याबाबत त्यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याचे समजते. 

नियमनमुक्तीचा प्रभाव 
चार वर्षांपुर्वी बाजार समितीच्या नियंत्रणातून फळे, भाजीपाला मुक्त करण्यात आला. मात्र याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून झाली नाही. मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरे आणि उपनगरांमध्ये शेतकरी ते खरेदीदार यांच्यात अडत, हमाली, तोलाई शिवाय शेतीमालाची खरेदी-विक्री सुरळीत झाली आहे. ‘कोरोना’मुळे नियमनमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे तुर्ततरी चित्र आहे. 
 
अडत्यांवर भाजीपाला बास्केटच्या मागणीची वेळ 
बाजार समित्यांमधील अडत्यांनी वर्षानुवर्षे शेतीमालाच्या दरांवर स्वतःचे वर्चस्व ठेवले.  मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद ठेवल्याने  काही अडत्यांना शेतकऱ्यांच्या मुलांनी सुरु केलेली भाजीपाला बास्केटची मागणी नोंदवावी लागली. 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...