Agri Business News flowers demand increase in between festive season Pune Maharashtra | Agrowon

सणासुदीदरम्यान फुलांना मागणी वाढण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 जुलै 2020

पुणे ः येत्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या कालावधीत फुलांना मागणीबरोबरच दरही वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अनेक ठिकाणी फुलांचे लागवड क्षेत्रात घटल्याने उत्पादन आणि मागणी संतुलित राहून दर वाढण्याची शक्यता शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

पुणे  : मार्चपासून राज्यात ‘कोरोना’चे संकट आहे. या संकटातून शेतकरी सावरत आहेत. त्यातच फुलोत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंदिरे, लग्न सोहळे, समारंभ बंद असल्याने सर्वाधिक नुकसान फुलोत्पादक शेतकऱ्यांचे झाले होते. मात्र, येत्या गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या कालावधीत फुलांना मागणीबरोबरच दरही वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. अनेक ठिकाणी फुलांचे लागवड क्षेत्रात घटल्याने उत्पादन आणि मागणी संतुलित राहून दर वाढण्याची शक्यता शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

पुणे बाजार समितीमधील फुलांचे प्रमुख आडतदार सागर भोसले म्हणाले, की ‘कोरोना’ संकटात पहिले तीन महिने पुण्यातील फुलबाजार बंद होता. मात्र आता बाजार काही प्रमाणात सुरू झाला असला तरी, अद्याप सुरळीत झालेला नाही.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे गणेशोत्सव, दसरा, दिवाळीकरिता फुलोत्पादक शेतकऱ्यांनी लागवडीसाठी गुंतवणूक करण्याचे धाडस केले नाही. यामुळे बहुतांश ठिकाणी झेंडू, शेवंती, गुलछडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत आवक आणि मागणी संतुलित आहे. तसेच मंदिरे बंद असून, लग्न समारंभांवर मर्यादा असल्याने सजावटीसाठीच्या फुलांची मागणी घटली आहे. केवळ धार्मिक विधीसाठीच फुलांची मर्यादित मागणी आहे. 

सध्या श्रावण महिन्यामुळे फुलांची मागणी वाढली असून, दर देखील चांगले आहेत. गौरी, गणपतीसाठी फुलांची मागणी वाढून दर वधारण्याची शक्यता आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना दिलासा देईल, तसेच दसरा आणि दिवाळीसाठी देखील फुलांची मागणी वाढेल. असेही भोसले यांनी सांगितले. 

फुलोत्पादक शेतकरी बाळकृष्ण वर्पे (रा.धामणखेल, ता.जुन्नर) म्हणाले, की मी दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळीनिमित्त कलकत्ता आणि पिवळ्या वाणाच्या झेंडूची लागवड करत असतो. यंदा ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जोखीम पत्करत गणेशोत्सवासाठी दीड एकरांवर झेंडूची लागवड केली आहे. या फुलांची काढणी पुढील आठवड्यात सुरू होईल. सध्या श्रावण महिन्यामुळे पुणे आणि मुंबई बाजारात १०० रुपयांपर्यंत दर आहेत. गणेशोत्सवा दरम्यान हेच दर ६० ते ७० रुपये मिळण्याची शक्यता आहे. तसेच दसरा, दिवाळीसाठी देखील दीड एकरांचे नियोजन करत भांडवली गुंतवणूक केली आहे. पुढील आठवड्यात त्याची लागवड सुरू होईल.

‘कोरोना’ संकटामुळे अनेक शेतकऱ्यांनी फुलांची लागवडीची जोखीम घेतलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल आहे त्यांनी जोखीम पत्करत फुलांच्या लागवडी केल्या आहेत. मात्र गावात दरवर्षी ६० ते ७० एकरांवर होणारी लागवड यंदा १० ते २० एकर एवढीच झाली आहे.

शेवंती फुल उत्पादक शेतकरी बी.टी.बांगर (मंचर) म्हणाले, की मी दरवर्षी गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांसाठी नियोजन करून, पाच एकरांवर शेवंतीची लागवड करत असतो. मात्र यंदा ‘कोरोना’ संकटामुळे बाजार समित्यांसह मंदिरे, लग्न समारंभ बंद असल्याने मी लागवड केली नाही. लागवडीसाठीची जोखीम पण घेणार होतो. मात्र निसर्ग चक्रीवादळाचा फटका इतर पिकांना बसल्याने लागवड न करण्याचा निर्णय घेतला.

आमच्या भागातील शेतकऱ्यांनी शेवंती लागवडीसाठी आखडता हात घेतला आहे. यंदा लागवड न केल्याने माझे एकरी दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी लागवडीची जोखीम घेतली आहे त्यांच्या फुलांना चांगले दर मिळतील असा अंदाज आहे. 

प्रतिक्रिया
सध्या झेंडूला ५० ते १००, शेवंतीला ६० तर गुलछडीला ४० रुपये प्रति किलोपर्यंत दर आहे. गणेशोत्सवामध्ये फुलांची आवक वाढण्याची शक्यता असल्याने दर हेच राहतील. हे दर सरासरीपेक्षा जास्त असून, स्थिर राहतील. ‘कोरोना’ संकटामुळे राज्यात झेंडू, शेवंती आणि गुलछडी यांची लागवड कमी असल्याने दसरा आणि दिवाळीसाठी देखील आवक कमी राहील आणि मागणी वाढण्याची शक्यता असून दर वाढीचाही अंदाज आहे. 
- सागर भोसले, फुल आडतदार, पुणे बाजार समिती. 


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...