Agri Business News forty eight crore rupees crop loan distributed Pune Maharashtra | Agrowon

खेड तालुक्यात ४८ कोटींचे पीक कर्ज वाटप

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात घेतलेल्या पीक कर्जाची ३१ मार्चपर्यंत परतफेड केली आहे. अशा शेतकऱ्यांना पुणे जिल्हा बॅंकेकडून येत्या खरीप हंगामासाठी पीक कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पीक कर्ज घेण्यासाठी बॅंकेच्या शाखांमध्ये गर्दी करू नये. तसेच कर्ज घेताना योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
- विलास भास्कर, विभागीय अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, खेड, जि. पुणे.

पुणे  ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप सुरू केले आहे. खेड तालुक्यातील ७४४२ शेतकऱ्यांना ४८ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती बँकेचे विभागीय अधिकारी विलास भास्कर यांनी दिली.

खेड तालुक्यात पुणे जिल्हा बॅंकेच्या १८ शाखा कार्यरत आहेत. तालुक्यात शंभरपेक्षा जास्त सहकारी सोसायट्या आहेत. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वाटप केले जाते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा फायदा झाला आहे. त्यानंतर शासनाने दुसरे धोरण जाहीर करीत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी नियमित कर्ज भरली आहेत.

यंदा मार्चअखेर तब्बल ९७.५ टक्के कर्ज वसुली झाली आहे. ‘कोरोना’चे संकट आल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे म्हणून जिल्हा बॅंकेने शेतकऱ्यांना या महिन्याच्या सुरुवातीपासून पीक कर्जवाटप करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत खेड तालुक्यातील जिल्हा बॅंकेच्या १८ पैकी दहा शाखांमधून ७४४२ शेतकऱ्यांना ६३२३ हेक्टरसाठी ४८ कोटी ५६ लाख ७० हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. उर्वरित आठ शाखांच्या माध्यमातून पीक कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...