Agri Business News G R Chintala take charge as president of Nabard Nashik Maharashtra | Agrowon

जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ संपल्याने नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी जी.आर. चिंताला यांची निवड करण्यात आली आहे. श्री. चिंताला यांनी नुकताच (ता.२७)पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री.चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सह संस्था ‘नॅबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ संपल्याने नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर ॲण्ड रुरल डेव्हलपमेंटच्या (नाबार्ड) अध्यक्षपदी जी.आर. चिंताला यांची निवड करण्यात आली आहे. श्री. चिंताला यांनी नुकताच (ता.२७)पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी श्री.चिंताला हे बेंगळुरु येथील नाबार्ड मुख्यालयातील सह संस्था ‘नॅबफिन्स’चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
 

श्री.चिंताला हे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.`नाबार्ड’मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह हैदराबाद, लखनौ,चंदीगड,अंदमान आणि निकोबार, नवी दिल्ली आणि बेंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते `ॲग्री बिझनेस फायनान्स लि. हैदराबाद’चे दोन वर्ष उपाध्यक्ष तसेच बँकर ग्रामीण विकास संस्था लखनौचे संचालक राहिले आहेत.

तसेच श्री.चिंताला यांनी `प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्रित करण्यासाठी रोडमॅप` या विषयावर काम केले. ग्रामविकास मंत्रालयाच्या `स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमातींच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यक्षमता` या विषयावर सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांच्या शिफारशींमुळे देशभरात राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करण्यासाठी मदत झाली. तसेच त्यांनी अंदमान व निकोबार येथे कार्यरत असताना तेथील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील नारळ उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य दर निश्चित करण्याकरिता शेतकरी उत्पादक संघटनेची सुरुवात केली होती.


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...