Agri Business News grapes export to Germany Nederland satara maharashtra | Agrowon

निमसोडची द्राक्षे जर्मनी, नेदरलॅंडला रवाना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सातारा  ः खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक समस्यांवर मात करीत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले आहे. ही द्राक्षे नुकतीच जर्मनी, नेदरलॅंडला निर्यात करण्यात आली आहेत. सध्या निर्यात केलेल्या द्राक्षांना ११० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सातारा  ः खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरातील शेतकऱ्यांनी अनेक समस्यांवर मात करीत निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले आहे. ही द्राक्षे नुकतीच जर्मनी, नेदरलॅंडला निर्यात करण्यात आली आहेत. सध्या निर्यात केलेल्या द्राक्षांना ११० ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

खटाव तालुक्यातील प्रामुख्याने कलेढोण, मायणी, निमसोड, मोराळे, चितळी, विखळे, डांगेवाडी या कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी कष्टाच्या जोरावर माळारानावर द्राक्षाच्या बागा फुलवल्या आहेत. शेतकऱ्यांना चांगले दर तसेच मोठ्या बाजारपेठ मिळाव्यात, यासाठी कृषी विभागाकडून द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जाते. निर्यातीसाठी द्राक्षाचा दर्जा, नियम व अटी माहिती मिळण्याच्या दृष्टीने कृषी विभागाकडून प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. यातून यावर्षी ४२६ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी केली आहे. 

निमसोड (ता. खटाव) येथील एका कंपनीच्या माध्यमातून आत्तापर्यंत ३०० टन द्राक्षांची जर्मनी, नेदरलँड या देशात निर्यात करण्यात आहे. तसेच, सांगलीतील एका कंपनीच्या माध्यमातून दुबई, इंग्लड या देशांमध्येही द्राक्षे पाठविली जात आहेत.  नुकतेच निमसोड येथून द्राक्ष कंटेनर रवाना करण्यात आले. या वेळी मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे, द्राक्ष बागायतदार चेतन वरूडे, शिवम वरूडे, शुभम वरूडे, जितेश कदम, सुनील मोरे उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...