Agri Business News milk producers become in trouble due to corona issue Satara Maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यातील दूध उद्योगासह उत्पादक संकटात  

हेमंत पवार
गुरुवार, 9 एप्रिल 2020

संकटाच्या काळात माणसांना जगवण्याचे काम शेतकरी करीत आहेत. ‘कोरोना’चे कारण पुढे करून खासगी दूध डेअऱ्यांनी दुधाचे दर पाडले आहेत. अशा डेअरी चालकांवर शासनाने कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू. 
- साजिद मुल्ला, सातारा जिल्हाध्यक्ष, बळीराजा संघटना.

कऱ्हाड, जि.सातारा ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे दुधाच्या मागणीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे दुग्धोत्पादन शेतकरी अडचणीत आले आहेत. सहकारी दूध संघ मागणी ऐवढेच दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात दूध शिल्लक राहत आहे. त्याचा फायदा उठवत काही खासगी दूध संस्थांमार्फत संबंधित शेतकऱ्यांकडील दूध कमी दराने खरेदी केले जात आहे. त्यामुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे हे नवीन संकट उभे राहिले आहे. सरकारने यातून तोडगा न काढल्यास शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय मोडून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  
 

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. त्यातून उत्पादित दुधावर त्यांचा घर व अन्य खर्च भागतो. दुधाची आवक आणि मागणीच्या प्रमाणानुसार अनेकदा दुधाचे दर कमी-जास्त होतात. असे असले तरी दरात फारशी घट होत नाही. मात्र सध्याच्या ‘कोरोना’च्या संकटात हा व्यवसाय पुरता अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउन जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय, उद्योग बंद राहिले आहेत. त्याचबरोबर दूधाचीही मागणी घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

राज्य सरकारने राज्यातील अतिरिक्त १० लाख लीटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मेपर्यंत २५ रुपये दराने हे दूध खरेदी केले जाणार आहे. सहकारी दूध संघांकडील अतिरिक्त दूध खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या दुधापासून पावडर तयार केली जाणार आहे. त्यासाठी सरकारने तयारी केली आहे. मात्र त्यातून शेतकऱ्यांकडील सर्वच दूध खरेदी केले जात नाही. परिणामी सहकारी दूध संघांनी मागणीवर आधारित खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे दूध अतिरिक्त राहू लागले आहे. याचा फायदा खासगी दूध संघ घेत आहेत. त्यांच्याकडून कमी दराने दुधाची खरेदी केली जात आहे. परिणामी हा तोटा थेट शेतकऱ्यांनाच सहन करावा लागत आहे.
 
खासगी दूध संघांपुढेही अडचणी  
खासगी दूध संघाकडून मागणी कमी असतानाही सध्या दुधाची खरेदी केली जात आहे. त्यामुळे खरेदी केलेले दूध विकायचे कोठे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्याचबरोबर सहकारी आणि खासगी दूध संघ हे शेतकऱ्यांकडूनच दूध खरेदी करतात. त्यातही राज्यातील एकूण दूध उत्पादनापैकी ८० टक्के दूध हे खासगी दूध संघ खरेदी करतात. सहकारी खरेदी दूध संघांचा वाटा हा २० टक्के आहे. त्यामुळे सरकारने ज्याप्रमाणे सहकारी दूध संघांकडील १० लाख लीटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे खासगी दूध संघांचेही दूध खरेदी करावे, अशी मागणी खासगी दूध संघांनी शासनाकडे केली आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...