Agri Business News One crore turnover in the livestock market Pune Maharashtra | Agrowon

चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची उलाढाल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 जून 2020

पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद असलेला चाकण (ता.खेड) येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून (ता.३०) सुरू झाला. या बाजारात जर्सी गायी, बैल, म्हशी व शेळ्या मेढ्यांची मोठी आवक झाली. शनिवारी दिवसभरात सुमारे ४५४ जनावरांची विक्री झाली. यातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर बंद असलेला चाकण (ता.खेड) येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून (ता.३०) सुरू झाला. या बाजारात जर्सी गायी, बैल, म्हशी व शेळ्या मेढ्यांची मोठी आवक झाली. शनिवारी दिवसभरात सुमारे ४५४ जनावरांची विक्री झाली. यातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

चाकण येथील महात्मा फुले मार्केटच्या आवारात महिन्यातील प्रत्येक शनिवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो. लॉकडाउनमुळे हा बाजार बंद होता. बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी पणन विभागाकडे बाजार सुरु करण्याबाबत मागणी केली होती. या मागणीनुसार हा बाजार सुरू करण्यात आला. शनिवारी बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

विविध भागांतून शेतकरी जनावरे घेऊन तर काही जण जनावरे खरेदी करण्याकरिता आले होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन या ठिकाणी गर्दी टाळून आणि फिजीकल डिस्टन्स ठेवण्यात आला होता. मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले जात होते. तसेच प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून बाजारात सोडले जात होते. ज्या व्यक्ती मास्क अथवा रुमालाचा वापर करीत होते त्यांनाच मार्केटमध्ये प्रवेश दिला जात होता. तापमापक यंत्राच्या माध्यमातून प्रत्येकाची तपासणी केली जात होती, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 

शनिवारी चाकण येथील बाजारात विक्री झालेली जनावरे संख्या 
जनावरे आवक विक्री मिळालेला भाव
गाय १० १० ते ५० हजार
बैल ५० १५ १० ते ४० हजार
म्हैस २० २० ते ५० हजार
शेळ्या-मेंढ्या ११५० ४३० १२०० ते १० हजार

 


इतर अॅग्रो विशेष
कृषी पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा...नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतमाल काढणीपश्‍चात...
अजून एक `लातूर पॅटर्न’कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर एप्रिल, मे, जून...
सत्त्वयुक्त उत्पादनांची हवी कृषी...माणसाच्या उपभोगासाठी उपयुक्त असलेली जैवविविधता...
सिंधुदुर्गात मुसळधार सुरूच, पुरस्थिती...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागलेकोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस...
कृषी योजनांचे उद्दिष्ट तीन...नगर ः कृषी विभागातून शेतकऱ्यांसाठी देण्यात...
राज्यातील २५ लाख खातेदारांना साडेसोळा...मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
दूध भुकटी योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
जिल्हा बँकांना शासकीय व्यवहार करण्यास...मुंबई : शासकीय निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन...
राज्यात सावकारांकडून दरमहा १०० कोटींचे...सोलापूर : राज्यात मागील पाच वर्षांत तब्बल ७५२...
नियमनमुक्तीला पुणे महापालिकेचा हरताळपुणेः एकीकडे केंद्र आणि राज्य शासन शेतमाल बाजार...
विदर्भात वादळी पावसाचा अंदाजपुणे: कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय...
मराठवाड्यात सोयाबीनची सरासरीपेक्षा अधिक...औरंगाबाद : खरिपाच्या पेरण्या जवळपास ८३ टक्के...
कृषी व्यापार अध्यादेशामुळे दिलासापुणे: केंद्राने काढलेल्या ‘कृषी उत्पादने व्यापार...
खानदेश, मराठवाडा, वऱ्हाडात पावसाच्या सरीपुणे : मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने कोकणासह...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
‘सरफेसी' कायदा आहे तरी काय? दिवसेंदिवस बॅंकांच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत...
लष्करी’ हल्लाखरीप हंगामाच्या सुरवातीलाच राज्यात मका पिकावर...
कोकणात जोरदार पावसाची शक्यता पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने गेल्या काही...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू...