Agri Business News payment distribution start to milk sangh Pune Maharashtra | Agrowon

दूध संघांना पेमेंट वाटप सुरु

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 मे 2020

राज्यातील जादा दुधाची खरेदी व रूपांतरण योजना लागू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या योजनेला मुदतवाढ मिळण्यासाठी संघांचे प्रयत्न आहेत. ५० कोटी रुपये महासंघाच्या ताब्यात आल्याने दूध संघांच्या पेमेंट वाटपाला देखील सुरुवात झाली आहे.
- रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)

पुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या पेमेंटची प्रतिपूर्ती करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, या योजनेला मुदतवाढ मिळण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
‘‘शेतकऱ्यांचे कोणतेही पेमेंट महानंदमुळे थांबलेले नाही. उलट हा व्यवहार शेतकरी व दूध संघांमधील आहे. संघांनी ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतीचे दूध २५ रुपये दराने स्वीकारायचे आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात तसे पेमेंट जमा करून संगणकीय प्रणालीत माहिती भरायची आहे,’’ अशी माहिती ‘महानंद’च्या सूत्रांनी दिली.

तपासणीनंतरच होणार पेमेंट
संघांनी भरलेली ही माहिती तपासून घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहेत. गुणप्रतीनुसार शेतकऱ्यांना दर दिला की नाही हे तपासण्याची जबाबदारी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी किंवा प्रादेशिक दुग्धव्यवसाय अधिकाऱ्यांवर आहे. ‘‘दूध संघांनी शेतकऱ्यांना पेमेंट दिल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी तपासणे सक्तीचे आहे. ही माहिती प्रमाणित केल्यानंतरच महानंद संबंधित संघांना प्रतिपूर्तीच्या स्वरूपात रक्कम देणार आहे. त्यामुळे महासंघांकडून शेतकऱ्यांचे पेमेंट अडविले जाण्याचा मुद्दा उद्भवतच नाही,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

१२७ कोटींना मंजुरी
दूध खरेदी व रूपांतरणासाठी २०० कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा राज्य शासनाने केलेली असली तरी प्रत्यक्षात आत्तापर्यंत १२७ कोटी रुपयांना मान्यता दिली आहे. त्यातून महानंदच्या ताब्यात प्रत्यक्षात ५० कोटी रुपये मिळाले आहेत. राज्यात सहा एप्रिल ते २३ एप्रिल या दरम्यान चार कोटी लीटर दूध स्वीकारण्यास व १२७ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली गेली आहे. मात्र, संबंधित संघांनी शेतकऱ्यांना आधी पेमेंट केल्यानंतर ही रक्कम वाटप केली जाणार आहे,’’ असा निर्वाळा दुग्धविकास खात्याच्या सूत्रांनी दिला.

 २०६३ टन भुकटी तयार
दरम्यान, महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख म्हणाले की, दूध खरेदी योजनेसाठी निधीची कमतरता नाही. या योजनेतून आत्तापर्यंत २०६३ टन पावडर (भुकटी) व १०८९ टन बटर (लोणी) तयार झालेले आहे. हा माल सुरक्षितपणे गोदामात ठेवला जात आहे. निविदा पद्धतीने तो विक्री केला जाईल.
 


इतर अॅग्रो विशेष
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा बंद मागे;...औरंगाबाद :  कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा...
शण्मुख नाथन झटतोय निंब वृक्ष वाढीसाठीअकोला ः वृक्ष संवर्धन, पर्यावरणाच्या उद्देशाने...
देशात कृषी स्टार्टअपला वाव : संगीता...पुणे: जगात कृषी क्षेत्रातील प्रत्येक नववा...
सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या राज्यात ५४...पुणे ः खरीप हंगामात सोयाबीन बियाणे...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे: मॉन्सून सक्रिय होण्यास पोषक हवामान होत...
आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला...मुंबई: आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला,...
बांगलादेशात रेल्वेद्वारे कांदा निर्यातनाशिक: जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा...
देशात आता जनुक क्रांतीची गरज : माजी...पुणे: देशाला आता हरितक्रांती नव्हे तर आता जनुक...
शेळ्या-मेंढ्यांचे बाजार सुरु करा  नगर ः सध्या आषाढ महिना सुरु असून या महिन्यात...
बियाणे संबंधित तक्रारींचा तत्काळ निवाडा...नाशिक: निकृष्ट बियाण्यासंबंधी तक्रारी आल्यानंतर...
संत्रा उत्पादन वाढीचा अंदाजअमरावती ः पोषक वातावरणाच्या परिणामी या वर्षी...
मागण्या मान्य करा, अन्यथा दूध पुरवठा...औरंगाबाद  : अत्यल्प दर मिळत असल्याने आम्ही...
उथळ निर्णय की सखोल अभ्यासकेंद्र सरकारने ग्लायफोसेटचा वापर देशभर केवळ कीड...
लसीला लागण राजकारणाची ?‘कोरोना’ग्रस्ततेत अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे....
संगमनेर तालुका संघाकडून ५० टक्के...नगर: संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दूध...
उगाव येथे सामूहिक पातळीवर दशपर्णी अर्क...नाशिक: निफाड तालुक्यातील उगाव येथील श्री. श्री....
किसान क्रेडिट कार्डवर बिनव्याजी कर्ज...नाशिक: शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आर्थिक मदत करणे...
दुधाला दर नसल्याने, दुभती जनावरे ...सोलापूर ः दुधाला मागणी असूनही केवळ योग्य तो दर...
मराठा समाजाला विश्वासात घेणार : अशोक...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य...