बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथमच बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. बी-हेव्ही इथेनॉलला प्रतिलिटर ५४ रुपये २७ पैसे असा दर आहे. मात्र, साखरेला उठाव नाही, विक्रीचा कोटा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांचा कल अल्कोहोल निर्मितीकडेच आहे. - उमेश परिचारक,अध्यक्ष, युटोपियन कारखाना, मंगळवेढा, जि. सोलापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन निर्मितीस वाव मिळावा या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील १५ साखर कारखान्यांना बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रथमच परवानगी दिली आहे. नऊ कोटी ८५ लाख ४७ हजार ५८१ लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील ११९ कारखान्यांमधून १६१ कोटी ९२ लाख लिटर अल्कोहोल निर्मिती केली जाते. ११७ साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प असून, त्यांची १६४ कोटी ११ लाख लिटर क्षमता आहे.  बी-हेव्ही मोलॅसिसला साडेदहा रिकव्हरी असलेल्या कारखान्यांमधून एक टन उसापासून १०५ किलो साखर अन्‌ ३२० लिटर इथेनॉल तयार होत असल्याने यंदा कारखान्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, राज्यात आठ लाख २२ हजार हेक्‍टरवर गाळपासाठी ऊस शिल्लक असून, त्यापैकी पाच लाख १८ हजार मेट्रिक टन उसापासून ५८ लाख टन साखर निर्मिती होईल, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. मात्र, राज्यातील १४३ साखर कारखान्यांपैकी आत्तापर्यंत ६८ साखर कारखान्यांचेच गाळप सुरू झाले, असेही आयुक्‍तालयातून सांगण्यात आले. 

या कारखान्यांना मिळाली परवानगी श्री दत्त इंडिया (सांगली), किसनवीर (भुईंज), श्रीनाथ मस्कोबा (पुणे), दौंड शुगर (पुणे), जकराया, युटोपियन (सोलापूर), संजीवनी कारखाना (नगर), व्ही. व्ही. पाटील (प्रवरानगर), अंबालिका (नगर), सातपुडा-तापी (नंदुरबार), अंबेजोगाई (बीड), माजलगाव, वैद्यनाथ (बीड), विकास कारखाना (लातूर), सागर वाइन डेक्‍कन (यवतमाळ). 

वारणा कारखान्याची थेट उसापासून इथेनॉल निर्मिती   वारणा येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखाना प्रथमच थेट उसापासून इथेनॉलची निर्मिती करणार आहे. थेट उसापासून तयार केलेल्या इथेनॉलला प्रतिलिटर ५९ रुपये ४८ पैसे इतका दर देण्यात आला आहे. २६ लाख ८१ हजार ७३९ लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट या कारखान्याला देण्यात आले आहे. थेट उसापासून इथेनॉल तयार करणारा हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com