agri business news permission gives for ethanol production from heavy molasses solapur maharashtra | Agrowon

बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी

तात्या लांडगे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रथमच बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे. बी-हेव्ही इथेनॉलला प्रतिलिटर ५४ रुपये २७ पैसे असा दर आहे. मात्र, साखरेला उठाव नाही, विक्रीचा कोटा मर्यादित असल्याने शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक कारखान्यांचा कल अल्कोहोल निर्मितीकडेच आहे.
- उमेश परिचारक, अध्यक्ष, युटोपियन कारखाना, मंगळवेढा, जि. सोलापूर.

सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन निर्मितीस वाव मिळावा या उद्देशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील १५ साखर कारखान्यांना बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला प्रथमच परवानगी दिली आहे. नऊ कोटी ८५ लाख ४७ हजार ५८१ लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यातील ११९ कारखान्यांमधून १६१ कोटी ९२ लाख लिटर अल्कोहोल निर्मिती केली जाते. ११७ साखर कारखान्यांकडे इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प असून, त्यांची १६४ कोटी ११ लाख लिटर क्षमता आहे.  बी-हेव्ही मोलॅसिसला साडेदहा रिकव्हरी असलेल्या कारखान्यांमधून एक टन उसापासून १०५ किलो साखर अन्‌ ३२० लिटर इथेनॉल तयार होत असल्याने यंदा कारखान्यांना तशी परवानगी देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, राज्यात आठ लाख २२ हजार हेक्‍टरवर गाळपासाठी ऊस शिल्लक असून, त्यापैकी पाच लाख १८ हजार मेट्रिक टन उसापासून ५८ लाख टन साखर निर्मिती होईल, असा अंदाज साखर आयुक्‍तालयाने व्यक्‍त केला आहे. मात्र, राज्यातील १४३ साखर कारखान्यांपैकी आत्तापर्यंत ६८ साखर कारखान्यांचेच गाळप सुरू झाले, असेही आयुक्‍तालयातून सांगण्यात आले. 

या कारखान्यांना मिळाली परवानगी
श्री दत्त इंडिया (सांगली), किसनवीर (भुईंज), श्रीनाथ मस्कोबा (पुणे), दौंड शुगर (पुणे), जकराया, युटोपियन (सोलापूर), संजीवनी कारखाना (नगर), व्ही. व्ही. पाटील (प्रवरानगर), अंबालिका (नगर), सातपुडा-तापी (नंदुरबार), अंबेजोगाई (बीड), माजलगाव, वैद्यनाथ (बीड), विकास कारखाना (लातूर), सागर वाइन डेक्‍कन (यवतमाळ). 

वारणा कारखान्याची थेट उसापासून इथेनॉल निर्मिती 
वारणा येथील तात्यासाहेब कोरे साखर कारखाना प्रथमच थेट उसापासून इथेनॉलची निर्मिती करणार आहे. थेट उसापासून तयार केलेल्या इथेनॉलला प्रतिलिटर ५९ रुपये ४८ पैसे इतका दर देण्यात आला आहे. २६ लाख ८१ हजार ७३९ लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट या कारखान्याला देण्यात आले आहे. थेट उसापासून इथेनॉल तयार करणारा हा राज्यातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
 
 


इतर बातम्या
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
सौर कृषिपंप योजनेच्या कामांना वेग द्या...सोलापूर : ‘‘एचव्हीडीएस आणि मुख्यमंत्री सौर...
युवकांनो शेतमाल विक्रीचे नियोजन करा :...जालना : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विकेल तेच...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी एकत्र...नाशिक  ः ‘‘आदिवासी बांधवांना रोख...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
काकडा परिसरात बाधित क्षेत्राला...काकडा, जि. अमरावती : गेल्या आठवड्यात झालेल्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...