सातारा जिल्हा बॅंकेस १३३.९५ कोटींचा करपूर्व नफा

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस २०१९-२० या आर्थिक वर्षात १३३.९५ कोटींचा करपूर्व तर करोत्तर १०९.९८ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच विक्रमी नफा झाला आहे. या वर्षात ९५३ विकास सेवा सोसायट्यांपैकी ७२० सोसायट्या नफ्यात आणण्यात बॅंकेला यश आले असून यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेस २०१९-२० या आर्थिक वर्षात १३३.९५ कोटींचा करपूर्व तर करोत्तर १०९.९८ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच विक्रमी नफा झाला आहे. या वर्षात ९५३ विकास सेवा सोसायट्यांपैकी ७२० सोसायट्या नफ्यात आणण्यात बॅंकेला यश आले असून यावर्षी सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

श्री. भोसले म्हणाले, की जिल्हा बॅंकेने मार्च २०२० अखेर ठेवींचा सात हजार ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॅंकेचा मार्च २०२० अखेर १२ हजार ८६७ कोटी ४५ लाख इतका संमिश्र व्यवसाय झाला आहे. या आर्थिक वर्षात बॅंकेस १३३.९५ कोटी करपूर्व तर १०९ कोटी ९८ लाख रुपये करोत्तर नफा झाला आहे. या आर्थिक वर्षात मार्चअखेर ढोबळ एनपीएचे प्रमाण ०.२३ टक्के तर निव्वळ एनपीए शून्य टक्के ठेवण्यात बॅंकेला यश आले आहे. बॅंकेची ही गेल्या १२ वर्षांपासूनची कामगिरी राहिली आहे. या उल्लेखनीय कामाबद्दल आरबीआय व नाबार्ड यांनी बॅंकेला विशेष सन्मानित केले आहे.

२००७-०८ पासून बॅंकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाणे शून्य टक्के राखले आहे. वसूल भागभांडवलात विक्रमी वाढ झाली असून गेल्यावेळच्या भागभांडवलात २७ कोटींनी वाढ होऊन यावर्षी भागभांडवल २२४ कोटी झाले आहे. बॅंकेने गुंतवणुकीकरिता स्वतंत्र विभागाची स्थापना केली असून सरकारी कर्जरोख्यांच्या ट्रेडिंगमधून या आर्थिक वर्षात सात कोटी ११ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

यावर्षी जिल्ह्यातील ९५३ विकास सेवा सोसायट्यांपैकी ७२० विकास संस्था नफ्यात आणण्यात यश आले आहे. मागील १० वर्षांहून अधिक काळ १० टक्‍क्‍यांहून अधिक लाभांश दिला असून गेल्यावर्षी १२ टक्क्यांप्रमाणे १६ कोटी २२ लाखांची तरतूद केली होती. या आर्थिक वर्षात बॅंकेच्या सभासदांना १२ टक्के लाभांशाची तरतूद केली असून त्यासाठी २३ कोटी ९६ लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.

बॅंकेचे महत्त्वाचे निर्णय

  •  ग्राहकांच्या सोईसाठी ४७ एटीएम कार्यान्वित
  • ६५० मायक्रो एटीएममधून दुर्गम भागातील ग्राहकांना घरपोच बॅकिंगसेवा
  • आणखी १०० एटीएम कार्यान्वित करणार
  • मोबाईल बॅंकिंग व्हॅनची खरेदी
  • आत्महत्याग्रस्त पाच शेतकऱ्यांच्या वारसांना साडेचार लाखांची मदत
  • यशवंत किसान मंचच्या माध्यमातून ४५ शेतकरी गट स्थापन
  • सात -बारा व खाते उतारे बॅंकेच्या शाखेत मिळणार
  • ‘कोरोना’ निवारणासाठी दोन कोटी १६ लाखांची मदत
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com