Agri Business News rates of Ginger decrease due to lack of demand Satara Maharashtra | Agrowon

पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने आल्याच्या दरावर परिणाम

विकास जाधव
मंगळवार, 19 मे 2020

देशातील प्रमुख बाजारपेठा बंद असल्यामुळे आल्यास मागणी कमी आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे. आले काढणीवर भर असल्याने आवक जादा प्रमाणात होत आहे. आले काढणीचा खर्च व्यापाऱ्यांकडे असतो. या काढणीसाठी परप्रांतीय मजुर उपयुक्त ठरतात. सध्या हे मजूर निघून गेले असल्याने काढणीचे दर वाढले आहेत. तसेच बारदानाच्या खर्चात वाढ झाली आहे. या सर्व बाबींचा आले पिकाच्या दरावर परिणाम होत आहे.
- अविनाश गोरे, आले व्यापारी, नागठाणे, जि. सातारा.

सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॅाकडाउनचा इतर पिकांप्रमाणे आले (अद्रक) पिकासही फटका बसू लागला आहे. राज्यासह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद असल्यामुळे आले पिकाच्या व्यवहारावर मर्यादा असून त्यास मागणी कमी झाली आहे. गत महिन्यात स्थानिक व्यापारी २० हजार २२ हजार रुपये प्रतिगाडी या दराने आले खरेदी करीत होते. मात्र मागणी अभावी हे दर आता निम्म्याने कमी झाले असून सध्या स्थानिक व्यापारी १२ हजार ते १४ हजार रुपये प्रतिगाडी या दराने आले खरेदी करीत आहेत.

राज्यात सातारा व औंरगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक आले पीक घेतले जाते. मागील सहा ते सात वर्षांत आल्यास समाधानकारक दर मिळत असल्याने या पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गतवर्षी सातारा जिल्ह्यात सरासरी २५०० हेक्टरवर आले लागवड झाल्याचा अंदाज असून यावर्षी आले पिकाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी बियाणे खरेदी मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र मार्च महिन्यापासून देशभरात ‘कोरोना’चे संकट आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र लॅाकडाउन सुरू केल्याने मुंबई, पुणे याप्रमुख बाजारपेठा बंद झाल्या आहेत. परिणामी सर्व पिकांना फटका बसला आहे. यामध्ये आले या नगदी पिकांची भर पडली आहे. मागील दी़ड ते दोन महिन्यांत प्रति गाडीस (५०० किलो) २० ते २२ हजार रुपये दर मिळाला होता. बियाण्यास विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या दरम्यान दर मिळाला होता.

पुणे, मुंबई या प्रमुख बाजारपेठातील अस्थिर वातावरणामुळे आले दरात घसरण झाली आहे. सध्या आले पिकास १२ ते १४ हजार रुपये दर दिले जात आहे. लॅाकडाउनमुळे आले पिकाचे दर तुलनेत निम्म्यावर आल्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लॅाकडाउनमुळे मागील दोन महिन्यांत आले काढणी न झाल्यामुळे माल तुंबून राहिल्याने सध्या आले विक्रीस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागले आहे. दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांचा आले काढणीकडे कल वाढला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नदी काठावर आले धुण्याची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या दरामुळे नवीन लागवडीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...