सह्याद्री सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेत

सह्याद्री कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे. त्याचा उत्पादन खर्च पाहून त्याची किंमत निश्‍चित केली जाईल. बाजारपेठेतील सॅनिटायझरच्या किमतीपेक्षा त्याची किंमत नागरिकांनी परवडणारी असेल. लवकरच बाजारपेठेत सॅनिटायझर विक्रीस उपलब्ध होईल. - बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री तथा अध्यक्ष, सह्याद्री सहकारी साखर कारखाना.
सह्याद्री कारखान्याने सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली आहे
सह्याद्री कारखान्याने सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली आहे

कऱ्हाड, जि. सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी सध्या नागरिकांकडून मास्क, सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बाजारपेठेत सॅनिटायझरची कमतरता जाणवत असल्याने सहकारी साखर कारखान्यांनी आता सॅनिटायझर निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. सह्याद्री कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा किंमतीत सह्याद्री कारखान्याचे हॅन्ड सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसातून दर दोन तासांनी हात धुवा, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मात्र ‘कोरोना’चा पहिला रूग्ण सापडल्यानंतर बाजारपेठेत मास्क व हॅन्ड सॅनिटायझरची कमतरता जाणवू लागली. यास्थितीत सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर मिळावे, यासाठी काही साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. यात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्ष असलेल्या सह्याद्री कारखान्यानेही सॅनिटायझरचे उत्पादन घेतले आहे. अल्कोहोल व त्यावर प्रक्रिया करून तयार करण्यात आलेले सॅनिटायझर विविध रंगात उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती कारखान्याच्या सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com