फळे, भाजीपाला निर्यातीसाठी पॅकिंग साहित्याचा तुटवडा 

मुंबई : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे महिनाभरापासून फळे आणि भाजीपाल्याची युरोपीय आणि आखाती देशांना होणारी निर्यात ठप्प झाली होती. मात्र पणन मंडळ आणि सरकारने पुढाकार घेतल्याने निर्यात सुरु करण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यानुसार ‘जेएनपीटी’मध्ये अडकलेला भाजीपाला आणि फळांच्या काही कंटेनरची निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात सुरु झाल्याचा आनंद निर्यातदारांना झाला असतानाच दुसरीकडे निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या कंपन्यांची गोदामे बंद असल्याने निर्यातीच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे निर्यात खुली होऊनही अनेकांना निर्यात करणे कठीण झाले आहे.
संग्रहित छायाचित्र

युरोपीय देशात होणारी भाजीपाला आणि फळांची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. सध्या केवळ दुबईमध्ये निर्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून बंदरात अडकलेले फळे आणि भाज्यांचे कंटेनरच पुढे पाठवण्यात आले आहेत. आता नवीन माल निर्यात करावयाचा झाल्यास त्यासाठी निर्यातीच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य मिळणे कठीण झाले आहे. भाज्या, फळे निर्यात करावयाची झाल्यास त्यासाठी लागणारे खोकी, आत टाकावा लागणारा कागद, त्यावर लावण्यात येणारी चिकटपट्टी हे प्राथमिक साहित्य अत्यंत गरजेचे आहे. मात्र या साहित्याच्या कंपन्या बंद आहेत. त्यामुळे हा माल निर्यातदारांना मिळत नाही.

या कंपन्यांना माल पुरवण्याची परवानगी द्यावी, यासाठी बाजार समितीमधील अनेक निर्यातदारांनी, निर्यातीसाठी सरकारने तयार केलेल्या ''वॉर रूम''मध्येही मदत मागितली. त्यानुसार कोकण आयुक्तांनी निर्यातीसाठी संबंधित परवानग्या देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीदेखील या कंपन्यांना मालाचा पुरवठा करण्याची परवानगी मिळत नसल्याने आम्हांला निर्यात करणे शक्य होत नसल्याचे फळ बाजारातील संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

सध्या बाजारात द्राक्षे, कलिंगड, टरबूज आणि आंबा मोठ्या प्रमाणात येत आहे. कोकण, कर्नाटकमधून सध्या आंब्याचीही आवक वाढत आहे. हा आंब्याचा हंगाम असल्याने आता आंब्याचा व्यापार सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र बाजारातील परिस्थिती पाहता हे शक्य होत नसल्याने आंब्याला येथेही उठाव नाही आणि निर्यात करावयाचे झाल्यास निर्यातही करता येत नाही. त्यामुळे व्यापारी आणि निर्यातदार दोन्ही त्रस्त आहेत. व्यापारही थंडावला असून शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे निर्यातीच्या आणि विक्रीच्या मार्गातील हे अडथळे दूर करण्याची गरज आहे.   ‘अडचणी सोडवण्याचे काम सुरु’ दरम्यान, निर्यात करणे सहज शक्य व्हावे, यासाठी बाजार समितीमध्ये विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे मुख्य भास्कर पाटील यांना या अडचणींबाबत विचारले असता, त्यांनी ज्या काही अडचणी येत आहेत, त्या सोडवण्याचे काम आम्ही करत आहोत. त्या अनुषंगाने विविध घटकांना मदत सुरु असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com