ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाज

कोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे वळलेल्या ब्राझीलने यंदा निर्णय बदलला आहे. इथेनॉलला दर मिळत नसल्याने तेथील बहुतांशी कारखाने निव्वळ साखरेचे उत्पादन करत आहेत. यामुळे यंदा तिथे विक्रमी साखर उत्पादन होण्याचे संकेत आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे वळलेल्या ब्राझीलने यंदा निर्णय बदलला आहे. इथेनॉलला दर मिळत नसल्याने तेथील बहुतांशी कारखाने निव्वळ साखरेचे उत्पादन करत आहेत. यामुळे यंदा तिथे विक्रमी साखर उत्पादन होण्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्राझीलचे साखर उत्पादन ३० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. ही भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरणार आहे. 

जगभरात ब्राझीलच्या साखरेला जादा प्रमाणात मागणी असते. परिणामी येत्या हंगामात भारतीय साखरेला मागणी कमी राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. ब्राझीलचा गाळप हंगाम संपेपर्यंत (मार्च अखेर) तेथे तब्बल ३९३ लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा कयास आहे. असे झाल्यास येत्या हंगामात ब्राझीलचे उत्पादन जगात पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर राहणार आहे. पान ४ वर  ब्राझीलच्या कोनॅब फूड सप्लाय एजन्सीजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या पाच महिन्यांत तेथील साखर उत्पादन ३५ टक्क्‍यांनी वाढले आहे.

भारतात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाले आणि ब्राझीलमध्ये त्याचवेळी म्हणजे एप्रिलमध्ये ऊस हंगामास सुरुवात झाली. साखर उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी केवळ ३५ टक्के उसाचा वापर साखर उत्पादनासाठी झाला. इंधनाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉलकडे ब्राझील वळला होता. पण इथेनॉलनिर्मिती कारखान्यांना फारशी फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे यंदा कारखाने वेगाने पुन्हा साखर निर्मितीकडे वळले आहेत. मार्चमध्ये त्यांचा हंगाम संपतो तोपर्यंत हा वेग कायम राहू शकतो.

भारतासाठी धोक्‍याची घंटा ब्राझीलचे साखर उत्पादन भारतासाठी मात्र डोकेदुखी ठरणार आहे. भारताने गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत गेल्यावर्षी उच्चांकी निर्यात केली. जुलै अखेरपर्यंत ५४ लाख टनांहून अधिक साखर भारतातून निर्यात झाली. याला ब्राझीलचे घटलेले साखर उत्पादन कारणीभूत ठरले. ब्राझीलमध्ये मार्चला साखर उत्पादन सुरू झाले. पहिल्या तीन महिन्यांत उत्पादन वाढले खरे पण ‘कोविड’मुळे त्यांची साखर जगभरातील बाजारपेठेत नव्याने गेली नाही.

पण भारताने अगोदरच करार केल्याने भारताची साखर इराणसह अन्य देशांमध्ये निर्यात झाली होती. यामुळे पहिल्या तिमाहीत ब्राझीलचे साखर उत्पादन वाढूनही त्यांना आलेली वाहतुकीची समस्या भारताच्या पथ्यावर पडली. पण आता आव्हान खडतर बनले आहे. जगभरात अनलॉक सुरू झाल्यानंतर त्यांची साखर जगभरातील बहुतांशी मुख्य बाजारांमध्ये पोचत आहे. दर्जाबाबत तेथील साखर नेहमीच भारतापेक्षा चांगली असल्याने त्यांच्या साखरेला मागणी जास्त असते असा अनुभव आहे. यामुळे भारताचा हंगाम सुरू व्हायला आणि ब्राझीलची साखर मोठ्या संख्येने जागतिक बाजारपेठेत यायला एकच गाठ पडणार असल्याने नव्याने करार करण्यासाठी भारताला झगडावे लागेल अशी चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया गेल्या वर्षी ब्राझीलमधील कमी साखर उत्पादन व ‘कोविड’मुळे भारताला निर्यातीची संधी मिळाली. खरे आव्हान येथून पुढे आहे. दर्जा व दर या दोन्ही बाबतीत आपल्याला ब्राझीलबरोबर तीव्र स्पर्धा करावी लागेल. बल्क ऑर्डर मिळविण्यासाठी यंदा झगडावे लागू शकते. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com