Agri Business News Turnover of direct sale of agricultural produce at fifteen crores Aurangabad Maharashtra | Agrowon

औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची उलाढाल १५ कोटींवर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला व फळे पुरवठादार शेतकरी, शेतकरी गटांच्या माध्यमातून होणारी थेट शेतीमाल विक्रीची उलाढाल १५ कोटींवर पोहोचली आहे.  

औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला व फळे पुरवठादार शेतकरी, शेतकरी गटांच्या माध्यमातून होणारी थेट शेतीमाल विक्रीची उलाढाल १५ कोटींवर पोहोचली आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही उलाढाल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांवर होती. 
 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन करण्यात आले. त्याचा परिणाम शेतीमालाच्या विक्रीवर झाला. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट फळे, भाजीपाला विक्रीची संकल्पना पुढे आली. कृषी विभागाच्या पुढाकारातून औरंगाबाद शहरात २९ मार्चपासून प्रत्यक्ष शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटांमार्फत प्रत्यक्ष फळे, भाजीपाला विक्री सुरू झाली.

तेव्हापासून २२ ऑगस्टपर्यंत औरंगाबाद शहरासह सर्व तालुक्यांत या विक्रीतून तब्बल बारा कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची उलाढाल झाली होती. २३ सप्टेंबरपर्यंत ही उलाढाल १५ कोटी १० लाख ८० हजार ८३२ रुपयांवर पोहोचली आहे. २२ व २३ सप्टेंबरला जिल्ह्यात विविध शेतकरी व शेतकरी गटांनी ३९ हजार ८२० किलो भाजीपाला व ३० हजार ४४० किलो फळांची विक्री केली तर २३ सप्टेंबर अखेरपर्यंत ५६ लाख ६५ हजार ८८७ किलो भाजीपाला व ६५ लाख ९६ हजार ६१७ किलो फळांची विक्री या थेट विक्री या साखळीतून झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.

सुरुवातीला जवळपास वीस शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागातून सुरू झालेला हा उपक्रम ७७ सहभागीदारपर्यंत पोहोचला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा, त्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा या उद्देशाने ही विक्रीची साखळी कृषी विभागाच्या पुढाकारातून निर्माण करण्यात आली होती. मोठ्या जोमाने सुरू झालेल्या या विक्री व्यवस्थेची गती सद्यःस्थितीत बऱ्यापैकी मंदावल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...
पुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...
वाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...
कृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...
लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...
माथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...
जालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना  : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...
कापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...
रत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...
नांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...
मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...
देवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...
पाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...
उद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...
भोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...
सोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...
पंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
विदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...
‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...
रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...